Virat Kohli Dance Video: आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ फेरीत बाहेर पडून भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे पण या दुःखापेक्षा भारतीयांना एक भन्नाट सरप्राईझ स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात मिळाले. किंग कोहलीच्या तब्बल तीन वर्षानंतरच्या शतकी खेळीने प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी व विराट फॅन सुखावला आहे. जगभरातून कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कोहलीच्या चेहऱ्यावर हास्य परत आलेलं पाहून फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात कोहली भन्नाट डान्स करताना दिसत आहे. एकीकडे कोहलीने ७१वे शतक झळकावताच दुसरीकडे हा कोहली डान्स ऑनलाईन शेअर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ पाहायला मिळतोय. यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी कोहलीच्या डान्सचे क्लिप एकत्र करून व्हिडीओ बनवलेला आहे. एकीकडे नागीन डान्स करत दुसरीकडे भांगडा मूव्ह्स करून कोहलीला मज्जा करताना पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. आम्हाला आशिया चषक नको तो तुम्हीच ठेवा पण आम्हाला आमचा कोहली परत मिळाला हेच खूप आहे असेही अनेकांनी म्हंटले आहे.

Video: इथे कोहलीने शतक लगावताच तिथे आजोबांनी… IND vs AFG नंतरचा सर्वात सुंदर क्षण पाहा

विराट कोहलीचा भन्नाट डान्स

विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून धावांसाठी झगडताना दिसत होता. अनेकवेळा शून्यावर बाद होण्याची त्याच्यावर वेळ आली होती. या कामगिरीचे मात्र विराट कोहलीला फारसे नवल वाटलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. माझे मुख्य लक्ष्य हे आगामी टी-२० विश्वचषक आहे, असे विराट कोहली म्हणाला. यापूर्वी २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कोहलीने शेवटचे शतक पूर्ण केले होते त्यानंतर तब्बल १०२१ दिवसाच्या तपस्येनंतर विराटने यशस्वी शंभर धावा पूर्ण केल्या आहेत.