Virat Kohli stylish six hit a security guard at Optus Stadium video viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने कांगारूंच्या गोलंदाजांना आपल्यापुढे गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय डावादरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहलीने मारलेला षटकार सीमारेषेवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाला लागला. त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

विराटच्या षटकाराचा व्हिडीओ व्हायरल –

विराट कोहलीला पहिल्या डावात केवळ ५ धावा करता आल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याने शानदार अर्धशतक झळकावले आहे. खरे तर विराट कोहलीने पर्थच्या मैदानावर कसोटी कारकिर्दीतील २९वा षटकार ठोकताच सर्वजण त्याच्या शॉटचे कौतुक करत होते, मात्र स्टेडियमच्या एका सुरक्षा रक्षकाला वेदना होत असल्याचे पाहून सगळेच शांत झाले. ही घटना भारतीय संघाच्या डावाच्या १००.४ षटकांत घडली, जेव्हा कोहलीने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर थर्ड मॅनला षटकार मारला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल आहे.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

विराटच्या षटकाराने सुरक्षारक्षक जखमी –

चेंडू थेट सीमारेषेच्या दोरीला आदळला आणि नंतर तो सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला लागला. त्यावेळी सुरक्षारक्षकला वेदना होत असलेला दिसत होते. चेंडू लागताच त्याने टोपी काढून डोक्यावर हात ठेवला. त्याला वेदना होत असल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लगेचच वैद्यकीय पथक त्याच्याकडे पोहोचले. यावेळी विराट कोहलीही थोडा चिंतेत दिसला आणि हातवारे करून गार्डच्या तंदुरुस्तीची विचारपूस करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : शिकारीच झाला शिकार! नॅथन लायनने टाकलेल्या जाळ्यात पद्धतशीरपणे अडकला ऋषभ पंत, पाहा VIDEO

तिसऱ्या दिवशीही भारताची दमदार कामगिरी –

भारतीय संघासाठी केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात २०१ धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने २९७ चेंडूंचा सामना करत १५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. केएल राहुल ७७ धावा करून बाद झाला. देवदत्त पडिक्कलने २५ धावा केल्या. भारताने ४५६ धावांची आघाडी घेतली. भारताने १२५ षटकांनंतर ५ बाद ४१० धावा केल्या आहेत. सद्या विराट ६६ आणि वॉशिंग्टनने २९ धावांवर खेळत आहेत.

Story img Loader