IND vs NED, World Cup 2023 Warm-up: गुवाहाटी येथे इंग्लंड विरुद्ध भारताचा विश्वचषकातील पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. आता टीम इंडिया दुसऱ्या सराव सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला पोहोचली आहे. येथे मंगळवारी म्हणजेच उद्या (३ ऑक्टोबर) रोजी भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे. मात्र, विराट कोहली या सामन्यात खेळू शकणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो अचानक टीम इंडिया सोडून मुंबईत परतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडिया रविवारी संध्याकाळी एका विशेष विमानाने चार तासांच्या प्रवासानंतर गुवाहाटीहून तिरुअनंतपुरमला पोहोचली, पण कोहली या संघाचा भाग नव्हता. वैयक्तिक इमर्जन्सीमुळे कोहलीने भारतीय संघ व्यवस्थापनाकडे रजेची विनंती केली होती, त्यामुळे तो गुवाहाटीहून मुंबईला गेला. मात्र, बीसीसीआयकडून आलेल्या वृत्तानुसार, कोहली सोमवारी संध्याकाळपर्यंत तिरुअनंतपुरममध्ये संघात सामील होऊ शकतो. असे झाल्यास तो कदाचित या सामन्याचा एक भाग असेल. भारतीय संघाचे सोमवारी पर्यायी सराव सत्र आहे. हवामानाने सहकार्य केल्यास टीम इंडिया सराव करू शकेल.

हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार, अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे. विराट कोहली पुन्हा एकदा बाबा होणार आहे. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार आहे. पण मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही ते ही बातमी शेवटी सर्वांबरोबर शेअर करणार आहेत. अनुष्काने जानेवारी २०२१ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. अनुष्काने एका मुलीला जन्म दिला होता. कोहली-अनुष्काने त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.

वृत्तानुसार, २०२३च्या वर्ल्ड कप दरम्यान अनुष्का विराटसोबत प्रवास करणार नाही. विश्वचषकादरम्यान कोहली विविध शहरांमध्ये सामने खेळणार आहे पण, तो अनुष्काबरोबर जाणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे कोहली आणि अनुष्काने आपल्या पहिल्या मुलीला आतापर्यंत लोकांपासून दूर ठेवले आहे. दोघांनीही वामिकाचा चेहरा दाखवणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. कोहली-अनुष्का या कौटुंबिक बाबतीत खूप खासगी राहणे पसंत करतात. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गरोदर असून ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला विरुष्काने दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा: Asian Games Medals Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मोडला १३ वर्ष जुना विक्रम, पहिल्यांदाच एका दिवसात जिंकली १५ पदके

टीम इंडियाला किमान तिरुअनंतपुरममध्ये खेळायला वेळ मिळेल अशी आशा असेल. मात्र, येथेही सामन्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पावसाची शक्यता आहे. Accuweather च्या अहवालानुसार, मंगळवारी तिरुअनंतपुरममध्ये ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भारताच्या या सराव सामन्यातही पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli did not go to thiruvananthapuram for the world cup warm up match against netherlands report avw
Show comments