२०१९ चा विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाच्या संघनिवडीबाबत मोठी चर्चा सुरू होती. ज्यामध्ये अंबाती रायुडूची २०१९ च्या विश्वचषक संघात निवड करण्यात आली नव्हती. यानंतर २०१९ चा विश्वचषक कायमच सर्वांना कटू आठवणी देणारा ठरला. या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली. हा सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. तर अंबाती रायुडूची निवड न केल्याने सुरूवातीपासूनच तो चर्चेचा विषय होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि २००७ टी-२० विश्वचषक विजेता रॉबिन उथप्पाने रायुडूच्या निवडीबाबत मोठा खुलासा केला.

‘ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बोलतान रॉबिन उथप्पाने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील नेतृत्त्वामध्ये काय फरक आहे हेदेखील सांगितलं. दरम्यान उथप्पाने संघनिवड करताना रायुडूकडे दुर्लक्ष केल्याची वादग्रस्त घटना सांगितली आणि कर्णधार विराट कोहलीवर दोषारोप केले. कॅन्सरमधून बरे झाल्यानंतर दिग्गज युवराजला ज्या प्रकारे वागणूक दिली त्याबद्दलही उथप्पाने कोहलीची निंदा केली.

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Rohit Sharma tells selectors he will remain India Test captain until board chooses the future captain
Rohit Sharma : ‘नवा कर्णधार शोधा…’, आढावा बैठकीत रोहित शर्माने बीसीसीआयकडे मागितली काही महिन्यांची मुदत?
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
Lucknow Auto Driver Murder case
Lucknow Murder case: प्रेयसीचे वडील समजून रिक्षावाल्याची हत्या; प्रेमप्रकरणाला गंभीर वळण
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार

हेही वाचा – युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

रॉबिन उथप्पा अंबाती रायुडूच्या निवडीबाबत सांगताना म्हणाला, जर विराटला कोणी आवडत नसेल किंवा त्याला जर वाटलं एखादी व्यक्ती चांगली नाहीय, तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत असे. अंबाती रायडू हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. सर्वांनाच त्याच्याबरोबर घडलेली घटना पाहून वाईट वाटते. प्रत्येकाची स्वतःची आवड असते, प्रत्येक खेळाडू हा या पातळीपर्यंत पोहोचयाला जीव ओतून प्रयत्न करत असतो.

हेही वाचा – Abhishek Sharma : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूशी दिल्ली विमानतळावर गैरवर्तन, इन्स्टा स्टोरी शेअर करत व्यक्त केला संताप

पुढे बोलताना उथप्पा म्हणाला, मला मान्य आहे की प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते, पण एखाद्या खेळाडूच्या तोंडावर तुम्ही दरवाजे बंद करू शकत नाही. माझ्यासाठी हे चुकीचं आहे. त्याची विश्वचषकाची जर्सी, किट बॅग, सर्वकाही होतं, ते त्याच्या घरी पाठवलं होतं. एखादा खेळाडू असा विचार करत असेल की मी आता विश्वचषक खेळणार आहे. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. मी एका महत्त्वपूर्ण ठिकाणी खेळणार आहे, मला माझ्या देशासाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे.

हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख

त्याची जर्सी, कपडे, किटबॅग त्याचं सामना हे सर्व विश्वचषकासाठी त्याच्या घरी पाठवलं असताना तुम्ही त्याला संघाबाहेर करत आहात तर हे चुकीचं आहे. हा अन्याय आहे. तुम्ही कोणाहीबरोबर असं केलं नाही पाहिजे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की या अशा वागण्यामुळे एखाद्याच्या मनावर याचा किती खोल परिणाम होईल, खेळाडू जाऊदे पण एक व्यक्ती म्हणून हा प्रकार त्याच्या मनात खोलवर गेलेला असेल. तुम्ही असं वागून एखाद्याच्या आत्मविश्वासाला तडा देत आहेत. त्यापेक्षा साधारण त्याच्याशी चर्चा करून सांगणं सोपं होतं. हा असा तडकाफडकी निर्णय घेण्यामागचं काय कारण होतं, असं उथप्पा पुढे म्हणाला.

Story img Loader