Virat Kohli Fears UFC Martial Arts: विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कारण त्याने आपला खेळ सातत्याने विकसित केला आहे. मैदानाबाहेरही तो चाहत्यांसाठी आपल्या मनमोहक हावभावांनी मने जिंकत असतो. तसेच कोहली वैयक्तिक आयुष्यात काय करतो, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमुळे व्यस्त आहे. दरम्यान, विराटने ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने स्वतःबद्दल काही खुलासे केले आहेत.
या व्हिडिओमध्ये तो त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थापासून सर्व गोष्टीबद्दस त्याच्या स्टाईलमध्ये बोलत आहे. पण सर्वात मनोरंजक खुलासा त्याने त्या गोष्टीबद्दल केला, जो खेळ खेळण्याचा प्रयत्न करताना त्याला भीती वाटते. आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणारा विराट कोहली म्हणतो की, तो UFC मिश्रित मार्शल आर्ट्स सारखे खेळ खेळण्याचा प्रयत्न करायला घाबरतो. त्याच क्लिपमध्ये, कोहलीने कबूल केले की गोल्फ हा एक खेळ आहे, जो शिकण्याचा प्रयत्न करूनही त्याला चांगल्या प्रकारे खेळता येत नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत कोहलीने दोन्ही डावात अनुक्रमे ४४ आणि २० धावा करत योगदान दिले. दिल्ली कसोटी जिंकून भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली आहे.
भारतीय संघ आता इंदूरला जाणार आहे. जिथे ते होळकर स्टेडियमवर तिसरी कसोटी खेळणार आहेत, परंतु त्याआधी खेळाडूंनी उर्वरित मालिकेसाठी त्यांची ऊर्जा वाचवण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त विश्रांती घेतली आहे.
शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.