Virat Kohli draw Puma Cat sketch video viral : विराट कोहली त्याच्या सुंदर फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार फलंदाजीने आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या कोहलीची गणना जगाातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याचबरोबर विराट कोहली भारतातील सर्वात देखण्या सेलिब्रिटींपैकी एक मानला जातो. पण आज आपण त्याच्या ‘ड्रॉइंग’ बद्दल जाणून घेणार आहोत. कारण त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोहलीचे ‘ड्रॉइंग’ कौशल्या त्याच्या फलंदाजीइतकेच सुंदर आहे की लहान मुलापेक्षा वाईट आहे? जाणून घेऊया.
विराट कोहलीच्या ड्राइंगचा व्हिडीओ व्हायरल
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने ‘प्यूमा कॅट’चे स्केच काढले आहे. कोहलीचे स्केच पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की लहान मूलही यापेक्षा चांगले स्केच काढू शकतात. कारण कोहलीने काढलेले स्केच पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की, त्याच्या फलंदाजीप्रमाणेच त्याचे स्केच अजिबात सुंदर नाही. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटने काढलेल्या या स्केचवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
विराट कोहलीची मागील काही सामन्यांमधील कामगिरी –
गेल्या काही काळापासून विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत असलेली दिसत आहे. अलीकडेच चेन्नईत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत कोहलीने दोन्ही डावात अनुक्रमे ६ आणि १७ धावा केल्या होत्या. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली धावा काढण्यात अपयशी ठरला होता. विराट कोहलीने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही पहिल्या सामन्यात २४ धावा, दुसऱ्या सामन्यात १४ धावा आणि तिसऱ्या सामन्यात २० धावा केल्या. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात एलबीडब्ल्यू बाद झाला होता.
विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिनचा मोठा विक्रम –
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. या विक्रमापासून तो फक्त ३५ धावा दूर आहे. हे करण्यात तो यशस्वी झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० पेक्षा कमी डावात २७ हजार धावा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादा क्रिकेटर ६०० पेक्षा कमी डावात २७ हजार धावांचा आकडा पार करेल.
हेही वाचा – जय शाह यांच्यानंतर BCCI सचिव कोण? नियुक्ती सोडा, नामांकन प्रक्रियेवरही चर्चा होणार नाही, नेमकं कारण काय?
सध्या सर्वात जलद २७ हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने ६२३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. कोहलीच्या नावावर ५९३ डावांमध्ये २६९६५ धावा आहेत. आतापर्यंत जगभरातील केवळ तीन फलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करता आल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांचा समावेश आहे.