आशिया चषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कर्णधारी शतकी खेळी करून संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी डावांत १९ शतके झळकाविण्याचा विश्वविक्रम केला आहे.
महा’विराट’रात्र!
याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या १३६ धावांची तडफदार खेळी केली आणि त्याच्या या आंतरराष्ट्रीय १२४ सामन्यात १९ वे शतक कोहलीने पूर्ण केले. सर्वात कमी सामन्यांत १९ शतके ठोकण्याचा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने १८९ आंतरराष्टीय सामन्यांत १९ शतके करण्याची कामगिरी केली होती. हा विक्रम कोहलीने मोडून काढला. कोहलीची ‘विराट’ कामगिरी यापुढेही अशीच सुरू राहिल्यास आगामी काळात तो आणखी नवे विक्रम रचेल अशी शक्यता क्रिकेटरसिकांमध्ये वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader