विराट कोहलीने नुकतेच कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी डिसेंबर २०२१मध्ये, त्याच्याकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. तर सप्टेंबरमध्ये त्याने टी-२० विश्वचषकानंतर टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. या सर्व घडामोडींनंतर विराट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यात फूट पडल्याचे दिसून आले. विराटने कसोटीचे कर्णधारपद का सोडले, यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता खुद्द विराटनेच याविषयीचे मौन सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यावर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२अशा पराभवानंतर विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आपण राजीनामा का दिला हे त्याने पूर्णपणे स्पष्ट केले नसले, तरी कर्णधारपद का सांभाळू शकत नाही, हे त्याने आता उघड केले.

हेही वाचा – “मला धक्काच बसला…”, विराटनं CAPTAINCY सोडल्यानंतर रिकी पाँटिंगला काय वाटलं एकदा वाचाच!

फायरराइड चॅटशी संवाद साधताना विराट म्हणाला, “लीडर होण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. महेंद्रसिंह धोनीने भारताचे कर्णधारपद सोडले, तेव्हा तो देखील संघाचा एक भाग होता. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही तो संघाचा प्रमुख होता. धोनी असा होता ज्याच्याकडून आम्ही अनेक सूचना घेतल्या. जेव्हा मी भारताचा कर्णधार झालो, तेव्हा संघाची संस्कृती बदलण्याचे माझे ध्येय होते. कारण भारतात कौशल्याची कमतरता नाही. जगात क्वचितच असा कोणताही देश असेल ज्याकडे असे कुशल खेळाडू असतील.”

विराट आता भारतीय संघाकडून फलंदाज म्हणून खेळणार आहे. यावर तो म्हणाला, “मला वाटते, तुम्हाला काय मिळवायचे आहे आणि तुम्हाला ते साध्य करता आले आहे की नाही याची समज असायला हवी? प्रत्येक गोष्टीची एक कालमर्यादा असते आणि तुम्हाला याची जाणीव असायला हवी. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघाला अधिक देऊ शकता, त्यामुळे त्याचा अभिमान बाळगा. मोठे होणे हा देखील नेतृत्वाचा एक भाग आहे. मला वाटते की प्रत्येक भूमिकेसाठी आणि जबाबदारीसाठी तयार असले पाहिजे. मी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलो आणि नंतर कर्णधार झालो, पण माझी विचारसरणी नेहमीच सारखीच होती. मी नेहमी एक कर्णधार म्हणूनच विचार केला.”

विराटने ६८कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यात संघाने ४० सामने जिंकले.