India vs South Africa 1st Test Match Updates : सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. त्यामुळे टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. दरम्यान विराट कोहलीने २०२३ साली एक असा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने केला नाही. सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा महान खेळाडू सचिन तेंडुलकरही आपल्या कारकिर्दीत असा विक्रम करू शकला नाही.

विराट कोहलीने रचला इतिहास –

खरंतर, विराट कोहलीने २०२३ सालची शेवटची इनिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात खेळली होती. या डावात कोहलीने ७६ धावा केल्या आणि या धावांसह विराट कोहली २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यामध्ये तिन्ही फॉरमॅटच्या धावांचा समावेश आहे. विराट कोहलीने यावर्षी एकूण २०४८ धावा केल्या आहेत. २०२३ मध्ये २००० हून अधिक धावा केल्यानंतर, विराट कोहली सात कॅलेंडर वर्षांत २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. या अगोदर हा विक्रम सहावेळा २०००हून अधिक धावा करणाऱ्या कुमार संगकाराच्या नावावर आहे.

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Virat Kohli Net Worth Brands Business Cars Lavish lifestyle Earnings and More on his 36th Birthday
Virat Kohli: विराट कोहलीची संपत्ती किती? क्रिकेटव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत काय? एका सोशल मीडिया पोस्टसाठी घेतो तब्बल…
How India lost in Test matches against New Zealand Where exactly did the Indian team go wrong
रोहित, विराट सुमार; युवकांतही सातत्याचा अभाव! भारतीय संघाचे नेमके चुकले कुठे?ऑस्ट्रेलियाविरुद्ध कितपत सज्ज?
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Ajaz Patel has become the foreign bowler who has taken the most wickets at the Wankhede
Ajaz Patel : भारतीय वंशाच्या एजाज पटेलचा वानखेडेवर विश्वविक्रम! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे

सातव्यांदा दोन हजारांपेक्षा जास्त धावा केल्या –

विराट कोहलीने २०१२ मध्ये पहिल्यांदा २००० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१६ ते २०१९ अशी सलग चार वर्षे विराट कोहलीने २००० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. मात्र, २०१९ नंतर विराट कोहलीची बॅट शांत झाली आणि त्यानंतर पुढील तीन वर्षे विराट कोहलीच्या बॅटने तशी कामगिरी केली नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही, पण २०२२ मध्ये झालेल्या आशिया चषकादरम्यान विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवला आणि आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले.

हेही वाचा – IND vs SA 1st Test : भारताचं आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका विजयाचं स्वप्न भंगलं

त्यानंतर विराट कोहलीची बॅट थांबली नाही आणि २०२३ मध्ये कोहलीने आयपीएलपासून वर्ल्ड कपपर्यंत प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत धावा केल्या. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतही विराट कोहलीने सर्वाधिक ७६५ धावा केल्या आणि एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.

हेही वाचा – INDW vs AUSW 1st ODI : ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६ विकेट्सने दणदणीत विजय, जेमिमा रॉड्रिग्जची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

कोहलीने कोणत्या वर्षात २००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, ते जाणून घेऊया.

१. २०१२ मध्ये २१८६ धावा केल्या
२. २०१४ मध्ये २२८६ धावा केल्या
३. २०१६ मध्ये २५९५ धावा केल्या
४. २०१७ मध्ये २८१८ धावा केल्या
५. २०१८ मध्ये २७३५ धावा केल्या
६. २०१९ मध्ये २४५५ धावा केल्या
७. २०२३ मध्ये २०४८ धावा केल्या