Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी १० दिवस बाकी आहेत. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे संघासोबत गेला नसल्याने, तो पर्थ कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियात सलग तिसरी मालिका जिंकण्याकडे टीम इंडियाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांनी भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दौऱ्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियात सलग तिसरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याच्या मानसिकतेने मैदानात उतरेल. यापूर्वी २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. २०१४ पासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या कालावधीत संघाने ४ मालिका जिंकल्या आहेत. आणखी एक मालिका जिंकून विजयी परंपरा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आता पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमधील पहिल्या पानांवर भारतीय खेळाडूंचे फोटो झळकल्याने सर्व चकित झाले आहेत.

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी भारतीय चाहत्यांना केले आकर्षित –

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी भारतीय चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हिंदी आणि पंजाबी भाषेत आपली मते लिहिली आहेत. याशिवाय हिंदीतही जाहिरात देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर आणि क्रिकेट बोर्डाला भारताविरुद्धच्या मालिकेतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आहे. ‘द डेली टेलिग्राफ’ने विराट कोहलीचा मोठा फोटो छापत या मालिकेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हेडिंग हिंदीतही लिहिले आहे. त्यांनी लिहिले, ‘युगांची लढाई.’ याशिवाय त्यांनी यशस्वी जैस्वालचाही फोटो छापला असून पंजाबीमध्ये ‘द न्यू किंग’ असे लिहिले आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

यशस्वी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील कसोटीसाठी सज्ज –

यशस्वी जैस्वालचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि कांगारूंविरुद्ध धावा काढण्यासाठी आतुर आहे. दुसरीकडे, विराट कोहलीला घरच्या मैदानावर गेल्या १० डावांमध्ये २१.३ च्या सरासरीने केवळ १९२ धावा करता आल्या आहेत. तो खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याची ऑस्ट्रेलियातील आकडेवारी उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला फॉर्मात येण्याची सुवर्णसंधी आहे.

हेही वाचा – MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी –

विराट कोहलीने २०११ पासून कांगारूंविरुद्ध २५ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ४७.४८ इतकी आहे. विराटने २०४२ धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात ८ शतके आणि ५ अर्धशतके आहेत. कोहलीची सर्वोच्च धावसंख्या १८६ धावा आहे. त्याचा ऑस्ट्रेलियातील आकडेवारी पाहिली, तर त्याने १३ सामन्यांमध्ये ५४.०८ च्या सरासरीने १३५२ धावा केल्या आहेत. त्याने कांगारूंविरुद्ध त्यांच्याच मैदानावर ८ पैकी ६ शतके झळकावली आहेत. यावरून त्यांचे वर्चस्व समजू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli front and center on australian newspaper covers yashavi jaiswal shines on back pages ahead ind vs aus test series vbm