नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात कोहलीने ‘विराट’ कामगिरीच्या जोरावर १४ स्थानांची उंच उडी घेत सर्वोतम २० मध्ये पोहचला. अफगानिस्तान विरुद्ध त्याने टी २० मधील पहिले शतक झळकवत आपण फॉर्म मध्ये आलो आहोत हे दाखवून दिले. तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज राहिला. विराटने आशिया चषक २०२२ मध्ये सुंदर खेळींचे प्रदर्शन केले. त्यामध्ये त्याने २ अर्धशतके आणि एका शतकाच्या जोरावर संपूर्ण मालिकेत २७६ धावा फटकावल्या आहेत. एकूण ५ सामन्यांमध्ये त्याने या धावा केल्या आहेत. यादरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या बॅटने खोऱ्याने धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने नाबाद १२२ धावा चोपल्या होत्या, जी त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली.

विराट आयसीसी फलंदाजांच्या टी २० क्रमवारीत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे. आशिया चषकापूर्वी तो ३३ व्या स्थानावर होता. आता विराटच्या खात्यात ५९९ गुण जमा झाले आहेत. तो भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून फक्त एका स्थानाने आणि ७ गुणांनी मागे आहे. रोहित ६०६ गुणांसह चौदाव्या क्रमांकावर आहे.

तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान अव्वलस्थानी कायम आहे. तो आशिया चषकातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही राहिला होता. त्याने ६ सामन्यात २८१ धावा केल्या होत्या. या प्रदर्शनानंतर त्याचे आयसीसी फलंदाजी क्रमवारीतील गुण ८१० झाले आहेत. रिझवाननंतर ऍडेन मार्करम ७९२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.यासह विराट क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आयसीसी फलंदाजी क्रमवारीत टॉप-१५ मध्ये असणारा फलंदाज बनला आहे. तो आता टी २० क्रमवारीत १४व्या स्थानावर आला आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रमवारीत १२ व्या स्थानावर त्याचा ताबा आहे.

Story img Loader