भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. कोहली त्याच्या चाहत्यांच्या आणि सोशल मीडियाच्या जगावर कायम राज्य करतो. चाहत्यांनी ट्विटरवर काही नवीन हॅशटॅग लाँच केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी कोहलीसह राफेल नदाल, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या खेळाडूंचा समावेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडिया हँडल ट्विटरवर विराट कोहली या हॅशटॅगला GOAT हे चिन्ह आता मिळाले आहे. GOAT हे Greatest Of All Time याचे संक्षिप्त स्वरूप आहे. हा हॅशटॅग खूप वेगाने व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटमधील विराटचे योगदान हे मोठे आहे. विराटच्या या कामगिरीचा सन्मान ट्विटरनं केला आहे.

३३ वर्षीय कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. २००८मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, क्रिकेट कारकिर्दीत त्याने ७० शतके ठोकली आहेत.

हेही वाचा – ICC Rankings : सूर्यकुमार यादव पुन्हा चमकला; व्यंकटेश अय्यरची गरुडझेप!

२०२०मध्ये त्याने २४ डावांत ८४२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ अर्धशतके झळकावली. २०२१मध्ये त्याने ३० डावांमध्ये ९६४ धावा केल्या, ज्यात १० अर्धशतकांचा समावेश आहे.