IND vs AUS, World Cup 2023 Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. विराट कोहलीने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी विश्वचषकाच्या सामन्यात आपल्या उकृष्ट फिल्डिंगचे उदाहरण सर्वांसमोर मांडले. खरं तर, पहिल्या स्लिपमध्ये अफलातून झेल घेण्याव्यतिरिक्त, कोहलीने आउटफिल्डमध्येही शानदार क्षेत्ररक्षण केले. त्यामुळे त्याला चेन्नईतील सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पदकही देण्यात आले. हे पदक मिळाल्यानंतर विराट कोहलीच्या सेलिब्रेशन पद्धतीची बरीच चर्चा होत आहे. बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीला पदक मिळवताच तो खूप आनंदित झाला, त्याने दिलीपला ते त्याच्या गळ्यात घालण्यास सांगितले आणि नंतर त्याच्या उत्साही सहकाऱ्यांना पुरस्कार दाखवताना दातांनी त्या मेडलला चावले आणि जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल विजयानंतर मेडल घेतल्यावर जशी पोझ देतो तशी दिली.

विराटला सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप यांच्या हस्ते कोहलीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहलीला एक खास मेडल देण्यात आले. कोहलीने हे पदक मोठ्या आनंदाने स्वीकारले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ड्रेसिंग रूममधील आतला व्हिडीओ शेअर केला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यापूर्वी सांगितले होते की यावेळी ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी वेगळे असेल आणि दिलीप संघाच्या खेळाडूला बक्षीस देईल.

संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप यांनी सांगितले की, “श्रेयस अय्यरने दोन अप्रतिम झेल घेतले. इशान किशनचे क्षेत्ररक्षणही चांगले होते. पण हा पुरस्कार विराट कोहलीला जातो.” दिलीप पुढे म्हणाले की, “आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, अशा खेळाडूबद्दल बोलतो जो एकंदरीत चांगली कामगिरी करतो. ज्याचा मैदानावरील जोश दीर्घकाळ टिकला आहे. अशा स्थितीत त्यांनी विराट कोहलीचे नाव घेतले. लहान मुलांसारखा डान्स करत कोहली हे बक्षीस घेण्यासाठी आला होता. जेव्हा त्याला हे पदक देण्यात आले तेव्हा त्याने ते आपल्या गळ्यात घालण्यास सांगितले. यानंतर कोहलीने त्याला ऑलिम्पिक पदक विजेत्याप्रमाणे चावा घेतला.

हेही वाचा: IND vs AUS, WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे धक्कादायक विधान; म्हणाला, “मी घाबरलो होतो…”

सामन्यात काय झाले?

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११६ चेंडूंचा सामना करत ८५ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ६ चौकार मारले. कोहलीने दोन झेलही घेतले. त्याने मिचेल मार्शचा डायव्हिंग झेल घेतला. त्याची खूप प्रशंसा होत आहे. विराटने अॅडम झम्पाचाही झेल घेतला. ऑस्ट्रेलियाने भारताला २०० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४१.२ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. राहुलने नाबाद ९७ धावा केल्या. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकला. सामन्यानंतर राहुलला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli got a special medal from bcci what is the exact reason watch the video in the dressing room avw