धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ कांगारुंच्या आव्हानाला सामोरं जाण्यास सज्ज आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकूनही ऑस्ट्रेलियाच्या उसळी माऱ्यापुढे मानहानी झाल्याचा वचपा काढण्याची संधी भारताकडे आहेच. पण कर्णधार म्हणून धोनीचे भवितव्य ठरवणारा दौरा, असं याकडे पाहिलं जाईल. धोनीची कॅप्टनशीप ग्रेट आहेच. त्यात शंकाच नाही. पण आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी ठाण मांडून बसलेल्या ए.बी. डीव्हिलियर्सला शह देण्यासाठी सज्ज असलेला भारतीय संघाचा ‘वझीर’ अर्थात कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष राहिल. कसोटी कर्णधार म्हणून कोहलीच्या कारकीर्दीचा यशस्वी श्री गणेशा झाला आहे. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यांत भारताची रनमशिन अशी ओळख असलेल्या कोहलीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आक्रमक वृत्तीसाठी ओळख असली तरी भरीव कामगिरी करून आगामी काळात एकदिवसीय संघाचीही जबाबदारी पेलण्याची कुवत आपल्यात आहे, हे कोहलीला या दौऱ्याच्या निमित्ताने दाखवून देता येईल. आफ्रिकेचा डी’व्हिलियर्स आणि आपला कोहली हे दोन आक्रमक फलंदाज सध्या एकदिवसीय क्रिकेटमधले कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. डीव्हिलियर्स ९०० गुणांसह अव्वल स्थानावर, तर कोहली ८०४ गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. तफावत ९४ गुणांची असली तरी कोहली यू कॅन डू इट..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli had chance to get top rank in icc