Virat Kohli Most Searched: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला गेल्या काही वर्षांतील कामगिरीमुळे जरी टीकेला सामोरे जावे लागले असले तरी त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. सोशल मीडियावर विराट कोहलीची वट जगातील इतर खेळाडूंपेक्षा जास्त पाहायला मिळते. त्याचवेळी, विकिपीडिया पेजच्या बाबतीतही कोहलीने बाकीच्या खेळाडूंना खूप मागे टाकले आहे. जागतिक क्रिकेटमधील इतर खेळाडूंच्या तुलनेत विराट कोहलीचे विकिपीडिया पेज सर्वाधिक सर्च केले जाणारे पेज ठरले आहे. कोहली सध्या भारतीय संघासह वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे संघाला १२ जुलैपासून डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे.

किंग कोहलीचे विकिपीडिया पेज जगात सर्वाधिक सर्च केले गेले आहे

विशेष म्हणजे विराट कोहलीने जगात म्हणजे संपूर्ण जगात एक अतिशय खास कामगिरी केली आहे. मैदानाव्यतिरिक्त विराट अनेकदा मैदानाबाहेरही अनेक विक्रम करत राहतो आणि आता विराटने आणखी एक विश्वविक्रम केला आहे. विराट कोहलीचे विकिपीडिया पेज संपूर्ण जगात सर्वाधिक सर्च केले जाणारे पेज बनले आहे आणि यासोबतच विराट हा विक्रम करणारा क्रिकेटर बनला आहे.

Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Virat Kohli Fined 20 Percent Match Fees and 1 Demerit Point For Sam Konstas Controversy
Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

हेही वाचा: MS Dhoni: न्यू लुकमध्ये एम.एस. धोनी चेन्नईत दाखल; विमानतळावर ‘थाला’च्या स्वागतासाठी चाहत्यांनी केला फुलांचा वर्षाव, Video व्हायरल

फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही तो अव्वल आहे

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली जगातील सर्वाधिक प्रिय क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची आकडेवारीमधून ते दिसून येते. खरं तर, इन्स्टाग्राम सर्वाधिक फॉलोअर्स असलेला किंग कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटर आहे. विराट कोहलीच्या सोशल मीडियावर फक्त इन्स्टाग्रामवर २५५ दशलक्ष म्हणजेच २५ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकेच नाही विराट कोहली हा जगातील सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत १६व्या क्रमांकावर आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला तो तिसरा अ‍ॅथलीट आहे.

वेस्ट इंडिजमध्ये विराट कोहलीची कसोटी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत बॅट अपेक्षेप्रमाणे बोलताना दिसली नाही. कोहलीने आतापर्यंत ९ कसोटी सामन्यांच्या १३ डावांमध्ये ३५.६१च्या सरासरीने ४६३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ शतक आणि २ अर्धशतकांची खेळी पाहायला मिळाली. त्याच वेळी, वेस्ट इंडिजविरुद्ध, कोहलीने १४ कसोटी सामन्यांमध्ये ४३.२६च्या सरासरीने एकूण ८२२ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा: Sunil Chhetri: “भारतासाठी सर्वोत्तम देण्याचा विचार येईल तेव्हा मी मेस्सी अन् रोनाल्डोलाही…”, कर्णधार सुनील छेत्रीचे मोठे विधान

कोहलीला WTC ची नवीन आवृत्ती अधिक चांगल्या प्रकारे सुरू करायला आवडेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दुसरी आवृत्ती विराट कोहलीसाठी काही खास नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील अहमदाबाद कसोटीत कोहलीने फलंदाजीत शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, याखेरीज त्याला कसोटीत विशेष कामगिरी करता आली नाही. याच कारणामुळे कोहलीची कसोटीतील सरासरीही ५० वर आली आहे. आता विराट कोहलीला WTC ची नवीन आवृत्ती अधिक चांगल्या पद्धतीने सुरू करायची आहे. कोहलीची सध्याची कसोटी सरासरी ४८.७३ आहे.

Story img Loader