Virat Kohli has become the second player after Sachin Tendulkar to play against father and son: भारतीय क्रिकेट संघ बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरला आहे. विंडसर पार्क, डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी मैदानात येताच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक खास कामगिरी केली आहे.
३४ वर्षीय कोहली कसोटी क्रिकेटमध्ये पिता-पुत्रांविरुद्ध खेळणारा दुसरा क्रिकेटर ठरला आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीसाठी विंडीज कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तेगनारायण चंद्रपॉलचाही समावेश आहे, जो अनुभवी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. कोहली शिवनारायण चंद्रपॉलविरुद्धही खेळला आहे आणि आता तो तेगनारायण चंद्रपॉलविरुद्धही खेळत आहे.
कोहलीने १२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तो शिवनारायण चंद्रपॉलविरुद्ध खेळला होता. या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. विराट आता शिवनारायण यांचा मुलगा तेगनारायण विरुद्ध खेळत आहे.
वडिलानंतर मुलाविरुद्ध खेळणारा विराट खास क्लबमध्ये सामील झाला आहे. विराटच्या आधी सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अशा पिता-पुत्राचा सामना केला होता. सचिनने १९९२ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन खेळाडू जेफ मार्श विरुद्ध खेळला होता. त्यानंतर २०११-११ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सचिन ज्योफ मार्शचा मुलगा शॉन मार्शविरुद्ध खेळला होता.
विराट कोहलीने २००८ मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. आता तो पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण करेल. कोहलीने जवळपास ६५० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो २०११ साली एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य राहिला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे, तर वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना ३६ षटकानंतर ५ बाद ८२ धावा केल्या आहेत. अॅलिक एथेनेझ २३ आणि जेसन होल्डरने एक धाव काढून खेळत आहे. भारताकडून गोलंदाजी करताना रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने दोन, तर शार्दुल ठाकुरने एक विकेट घेतली आहे.