India vs Australia 4thTest Match Updates: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एक खास विक्रम केला आहे. आपल्या बॅटने एकापेक्षा एक विक्रम करणाऱ्या फलंदाज कोहलीने क्षेत्ररक्षक म्हणूनही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने नॅथन लायनचा झेल टिपताच शानदारकामगिरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० झेल घेतले –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात विराट कोहलीने आर अश्विनच्या चेंडूवर नॅथन लायनचा झेल टिपला. त्यावेळी नॅथनने ९६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने हा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३०० झेल पूर्ण केले. कोहलीने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १०९ झेल घेतले आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० झेल घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३०० झेल घेणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय क्षेत्ररक्षक ठरला.

विराट कोहलीच्या आधी माजी खेळाडू राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम केला आहे. त्याने भारताकडून पहिले ३०० झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. राहुल द्रविडने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ५०९ सामन्यांमध्ये ३३४ झेल घेतले. तसेच एका सामन्यात सर्वाधिक चार झेल घेतलेत.विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आतापर्यंत ४९४ सामन्यात ३०० झेल घेतले आहेत. त्याने एका सामन्यात सर्वाधिक तीन झेल घेण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ३०० झेल घेणारा कोहली हा सातवा क्षेत्ररक्षक ठरला आहे.

हेही वाचा – IPL 2023: नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी लॉन्च; चाहत्यांनाही फक्त ‘इतक्या’ रुपयांत उपलब्ध

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ६६२ सामन्यांमध्ये ४४० झेल घेतले, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग ५६० सामन्यांमध्ये ३६४ झेल घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉस टेलरने ४५० सामन्यांत ३५१ झेल घेतले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. राहुल द्रविड ५०९ सामन्यांमध्ये ३३४ झेलांसह पाचव्या तर जॅक कॅलिस ५१९ सामन्यांमध्ये ३३८ झेलांसह चौथ्या स्थानावर आहे. या बाबतीत विराट कोहली सध्या सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: ‘ओये हटा उसको…’, रोहित शर्मा मैदानातच प्रेक्षकावर संतापला, पाहा Video

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप ७ क्षेत्ररक्षक –

महेला जयवर्धने – ६६२ सामने – ४४० झेल
रिकी पाँटिंग – ५६० सामने – ३६४ झेल
रॉस टेलर – ४५० सामने – ३५१ झेल
जॅक कॅलिस – ५१९ सामने – ३३८ झेल
राहुल द्रविड – ५०९ सामने – ३३४ झेल
स्टीफन फ्लेमिंग – ३९६ सामने – ३०६ झेल
विराट कोहली – ४९४ सामने – ३०० झेल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has become the seventh fielder in the world to take 300 catches in international cricket vbm