IND vs AUS 4th Test Match Updates:भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामना खेळला जात आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे, या डावात विराट कोहली उत्कृष्ट लयीत दिसत आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले आहे, यासह किंग कोहलीने आज आणखी एक मोठा विक्रम केला आहे. त्याने दिग्गज ब्रायन लारालाही मागे टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराटने लाराला मागे सोडले –

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराला मागे टाकले आहे. ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये ४७१४ धावा केल्या आहेत, ज्यात वनडेमध्ये १८५८ धावा आणि कसोटीत २८५६ धावा आहेत. ब्रायन लाराने टी-२० क्रिकेट खेळलेले नाही.

विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धावा –

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ४७२३ धावा केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये २०८३, कसोटीत १८४६ केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० मध्ये ७९४ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे किंग कोहलीने ब्रायन लाराला मागे टाकले आहे.

हेही वाचा – Hardik Vs Krunal: आयपीएलपूर्वी पांड्या बंधूंचा घरातच रंगला सामना; दोघांमधील सामन्याचा VIDEO होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करण्यात सचिन आघाडीवर –

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सर्वात पुढे आहे. मास्टर ब्लास्टरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ६७०७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये वनडेमध्ये ३०७७ धावा आणि कसोटीत ३६३० धावा आहेत.

विराटने भारतात ४००० धावा पूर्ण केल्या –

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे किंग कोहलीने हा विक्रम ५९ च्या सरासरीने केला आहे. तर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४७०० हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत कसोटीत ८२८३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 4thTest: रोहित शर्माने मायदेशात रचला मोठा विक्रम; पुजाराची बरोबरी करत ठरला दुसरा भारतीय

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द –

विराट कोहलीने १०८ कसोटी सामन्यांच्या १८३ डावांमध्ये ८२८३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २७ शतके आणि ७ द्विशतके आहेत. याशिवाय विराटने २९ अर्धशतकेही केली आहेत. विराट कोहली आज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ५९ धावा केल्यानंतर विराट अजूनही खेळपट्टीवर नाबाद आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून शतकाची अपेक्षा आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तरर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात २८९ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या १९१ धावांनी मागे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has broken brian laras record of highest runs against australia in ind vs aus 4th test match vbm