Virat Kohli and Anushka Sharma: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी जगभर प्रसिद्ध आहे. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले होते. २०२१ मध्ये अनुष्का शर्माने मुलीला जन्म दिला. दोघेही त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करतात, ज्याचा त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद होतो.अलीकडेच भारतीय फलंदाजाने अनुष्का शर्मासोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो म्हणाला की, दोघेही एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान एकमेकांना भेटले होते. अनुष्काला भेटण्यापूर्वी कोहली खूप घाबरला होता. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू आणि त्याचा जवळचा मित्र एबी डिव्हिलियर्सच्या ‘द 360 शो’मध्ये याचा खुलासा केला आहे.
विराट कोहली पॉडकास्टमध्ये म्हणाला, “मला आठवतंय ते २०१३ मध्ये घडलं होतं. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माझी कर्णधारपदी नियुक्ती झाली होती. माझा मॅनेजर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तुम्हाला अनुष्का शर्मासोबत जाहिरात शूट करायची आहे. हे ऐकताच मी खूप घाबरलो. मी हे कसे करू हे मला समजत नव्हते आणि मी आतून खूप घाबरलो होतो.”

तिथून आम्ही चांगले मित्र बनलो आणि आम्ही डेटिंगला सुरुवात केली –

विराट कोहलीने खुलासा केला की, अनुष्का शर्माचे नाव ऐकताच तो घाबरला होता. कारण बॉलीवूड अभिनेत्री केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध होते. तसेच आपण तिच्याशी कसे बोलावे हे त्याला अजिबात समजले नाही, आपण कसे बोलणार? त्यावेळची आठवण करून देताना कोहली म्हणाला की, मी तिच्या हिलवर एक विनोद केला होता, त्यानंतर आम्ही नियमितपणे एकमेकांना भेटू लागलो.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: टीम इंडिया उभारणार विजयाची गुढी? चेपॉकमध्ये ३६ वर्षांपासून आहे अजिंक्य; ‘हा’ खेळाडू असणार ट्रम्प कार्ड

कोहली पुढे म्हणाला, “मी आधीच खूप नर्व्हस होतो आणि मला माहित नव्हते की ती खूप उंच आहे. मी तिला पहिल्यांदा बोलताना म्हणालो होतो की, तुला याच्यापेक्षा जास्त उंच हिल घालायला मिळाले नाही का?’ तिने उत्तर दिले, ‘एक्सक्यूज मी?’ मला खूप वाईट वाटले आणि आणखी घाबरलो. पण नंतर मला वाटले की ती देखील सामान्य माणसासारखी आहे. तेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो तेव्हा आम्हाला कळले की आमची पार्श्वभूमी देखील खूप सारखीच आहे. तिथून आमची मैत्री झाली आणि आम्ही डेटिंगला सुरुवात केली. हे काही झटपट झाले नाही तर बराच वेळ गेला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has revealed that he met anushka sharma for the first time vbm