Virat Kohli 8 times dismissed on Nervous Nineties: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील २१व्या सामन्यात रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने २० वर्षानंतर आयसीसी स्पर्धेत ४ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तो ९५ धावांवर बाद झाला. या सामन्यात किंग कोहली कदाचित शतक पूर्ण करु शकला असता, पण अखेरच्या क्षणी तो झेलबाद झाला. त्यामुळे आज आपण विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती वेळा ‘नर्व्हस नाइनटीजचा’ बळी ठरला आहे? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्यांदा ‘नर्व्हस नाइनटीजचा’ बळी ठरला आहे. किवी संघाविरुद्ध खेळलेल्या या खेळीच्या जोरावर विराट कोहली आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धेत ३००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला. तसेच एकाच विश्वचषकाच्या हंगामात धावांचा यशस्वी पाठलाग करताना चार अर्धशतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८व्यांदा ‘नर्व्हस नाइन्टीजचा’ आठव्यांदा ठरला बळी –

विराट कोहली किवी संघाविरुद्ध ९५ धावा करून बाद झाला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही ८वी वेळ आहे, जेव्हा ‘नर्व्हस नाइनटीजचा’ ठरला आहे. विराट कोहली एकदा बांगलादेशविरुद्ध, दोनदा वेस्ट इंडिजविरुद्ध, एकदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, दोनदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि आत्तापर्यंत एकदा किवीविरुद्ध नर्व्हस नाइनटीजवर बाद झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ वर्षांनंतर कोहली नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला. न्यूझीलंडविरुद्ध नर्व्हस नाईन्टीजमध्ये विराट कोहली पहिल्यांदाच बाद झाला आहे. कोहली जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा नर्व्हस नाईन्टीजवर बाद झाला नसता, तर त्याच्या शतकांची संख्या ७८ नसून ८६ झाली असती.

हेही वाचा – PAK vs AFG, World Cup 2023: पाकिस्तानला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची तब्येत बिघडल्याने संघातून झाला बाहेर

विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यात ८ वेळा नर्व्हस नाईन्टीजवर बाद झाला आहे –

९१ धावा विरुद्ध बांगलादेश (२०१०)
९४ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज (२०११)
९९ धावा विरुद्ध वेस्ट इंडीज (२०१३)
९६ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०१३)
९१ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१६)
९२ धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध (२०१७)
९७ धावा इंग्लंड विरुद्ध (२०१८)
९५ धावा विरुद्ध न्यूझीलंड (२०२३)

कोहली सहाव्यांदा नर्व्हस नाइनटीजवर वनडेत बाद झाला –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्यांदा कोहली नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद झालेला भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याच्यासोबत १७ वेळा असे घडले आहे. कोहली व्यतिरिक्त, सौरव गांगुली आणि शिखर धवन देखील भारताकडून एकदिवसीय नर्व्हस नाईन्टीजमध्ये सहा वेळा बाद झाले आहेत. विराट कोहलीने आता गांगुली आणि धवनची बरोबरी केली आहे, तर वीरेंद्र सेहवाग वनडेमध्ये ५ वेळा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला होता.

हेही वाचा – World Cup 2023: इंग्लंडने रीस टॉप्लीच्या जागी बदली खेळाडूची केली घोषणा, जोस बटलरने ‘या’ आफ्रिकन खेळाडूवर व्यक्त केला विश्वास

एकदिवसीय क्रिकेटमध्ये नर्व्हस नाईन्टीजमध्ये सर्वाधिक वेळा बाद झालेले भारतीय फलंदाज –

१७– सचिन तेंडुलकर
६– विराट कोहली
६ – सौरव गांगुली
६ – शिखर धवन
५ – वीरेंद्र सेहवाग

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has so far been dismissed eight times by nervous nineties in international cricket vbm
Show comments