Virat Kohli scored his 49th ODI century against South Africa: ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराटने या विश्वचषकातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले आहे, मात्र आता चाहते शतकाची वाट पाहत आहेत. दरम्यान, विराट कोहलीने शतकासह एक मैलाचा दगड आपल्या नावावर केला आहे. खरंतर विराटने वनडे वर्ल्ड कपमध्ये १५०० धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने कुमार संगकाराला मागे टाकले आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांची बरोबरी केली.

विराट कोहलीने कुमार संगकाराला टाकले मागे –

विराट कोहली आता एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. आता त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर (४५ सामन्यांत २२७८ धावा) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (४६ सामन्यांत १७४३ धावा) आहेत. विराट कोहली अजूनही सचिन तेंडुलकरपासून ५०० धावा दूर आहे. बर्थडे बॉय विराट कोहलीने कुमार संगकाराला (३७ सामन्यांत १५३२ धावा) मागे टाकले आहे.

Kamindu Mendis became 1st Sri Lankan player to four fastest centuries in Test
SL vs NZ : कमिंदू मेंडिसने सात कसोटीत झळकावले चौथे शतक, श्रीलंकेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Matthew Short 5 Wickets Haul Becomes the First opening batsman from the Full Member nation to take 5 wickets in T20I
ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने चेंडूसह घडवला इतिहास, T20I मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket
IND vs BAN : गिल-जैस्वाल नव्हे तर ‘हा’ २६ वर्षीय खेळाडू भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज, सौरव गांगुलीचा दावा
Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
Joe Root break Steve Waugh record and now 2nd player who scored most Runs in winning Matches
Joe Root : जो रुटने सहा दिग्गजांना मागे टाकत केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू
Ayush badoni played biggest innings of t20 history in DPL 2024
DPL 2024 : आयुष बदोनीने खेळली भारतीय T20 इतिहासातील सर्वात मोठी खेळी, मोडला श्रेयस अय्यरचा विक्रम
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

घरच्या मैदानावर खेळताना विराटने पूर्ण केल्या ६ हजार धावा –

याशिवाय विराट कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये भारतात खेळताना ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावावर ६९७४ धावा आहेत. विराटने भारतात खेळताना ११९व्या डावात ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर सचिनने १६० डावात ४८.११च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या होत्या. तसेच, चालू विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीने रोहित शर्माला मागे टाकले आहे. विराट कोहली ५०० च्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याच्या पुढे न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि क्विंटन डी कॉक आहेत.

हेही वाचा – IND vs SA: ‘बर्थडे बॉय’ विराट कोहली ठरला शतकाधीश! ४९व्या वनडे शतकासह सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

विराट कोहलीची ४९वी शतकी खेळी –

विराट कोहली आपल्या ४९व्या शतकी खेळी खेळून नाबाद तंबूत परतला. त्याने १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्या. स्ट्राइक रेट ८३.४७ होता. टीम इंडियाने ५० षटकात ५ विकेट गमावत ३२६ धावा केल्या. विराट कोहलीने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत १०८.६० च्या सरासरीने ५४३ धावा केल्या आहेत. त्याने ४ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.

वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारा विराट सातवा फलंदाज ठरला –

या विश्वचषकात आतापर्यंत विराटने नाबाद १०१, ८५ धावा, नाबाद ५५, १६ धावा, नाबाद १०३, ९५ धावा, शून्य आणि ८८ धावा अशा खेळी केल्या आहेत. आज शतक झळकावत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरला आहे. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – NZ vs PAK: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तान संघाला आयसीसीचा दणका, सामन्यात झालेल्या चुकीमुळे भरावा लागणार मोठा दंड

वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे फलंदाज –

टॉम लॅथम -१४०* विरुद्ध नेदरलँड्स ०२/०४/२०२२
रॉस टेलर -१३१* विरुद्ध पाकिस्तान ०८/०३/२०१११
सनथ जयसूर्या -१३० विरुद्ध बांगलादेश ३०/०६/२००८
मिचेल मार्श -१२१ विरुद्ध पाकिस्तान २०/१०/२०२३
सचिन तेंडुलकर -१३४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया २४/०४/१९९८
विनोद कांबळी -१००* विरुद्ध इंग्लंड १८/०१/१९९३
विराट कोहली – १०१* विरुद्ध दक्षिण आफ्रिका ०५/११/ २०२३