IND vs AUS Perth Test Day 2 Updates in Marathi: जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत भारताच्या ऐतिहासिक पुनरागमनामध्ये मोठी भूमिका बजावली. बुमराहने त्याच्या कारकिर्दीत ११ व्यांदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी १०४ धावांवर सर्वबाद केले. भारताकडून बुमराहने ३० धावांत पाच विकेट घेतले, तर हर्षित राणाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतले. बुमराहच्या उत्कृष्ट गोलंदाजीचं कौतुक तर होतच आहे पण हर्षित राणाच्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं.

दिल्लीच्या हर्षित राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यातच हर्षितने आपल्या कामगिरीची छाप पाडली. त्याने पहिल्या डावात भारताच्या तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. सर्वप्रथम त्याने धोकादायक ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले आणि नंतर नॅथन लायन आणि मिचेल स्टार्कला बाद केले. शेवटच्या विकेटसाठी जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्यात चांगली भागीदारी झाली, जी अखेर हर्षितने मोडली.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

विराट कोहलीचं मार्गदर्शन आणि हर्षितने घेतली विकेट

विराट कोहलीने गोलंदाजीदरम्यान भारतीय गोलंदाजांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांना डावपेचही सांगितले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार जसप्रीत बुमराहही विराटचं मत घेताना दिसला. फलंदाजीत फेल ठरला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या या झटपट गेलेल्या विकेट्समध्ये विराटने मोठी भूमिका बजावली. विराट कोहलीने हर्षितला एक नाही तर दोन विकेट घेण्यास मदत केली. प्रथम विराट कोहलीने राणाला नॅथन लायनला गोलंदाजी करताना त्याच्या शरीराजवळ गोलंदाजी करण्यास सांगितले, त्यानंतर हर्षितनेही तसेच केले आणि लायनला बाद केलं.

हेही वाचा – IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल

हेही वाचा – Tilak Varma: तिलक वर्माची टी-२० मध्ये शतकांची हॅटट्रिक, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

लायन बाद झाल्यानंतर हेझलवुड आणि स्टार्कने भारतीय गोलंदाजांनी विकेटसाठी खूपच तंगवलं. या दोघांनी संघासाठी ३० धावांची चांगली भागीदारी रचली. हर्षित राणाने गोलंदाजी करताना स्टार्कला बाद करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्याने स्टार्कला बाऊन्सरही टाकले आणि त्यादरम्यान दोघांमध्ये चर्चाही झाली, स्टार्क त्याला म्हणाला मी तुझ्यापेक्षा जास्त वेगवान गोलंदाजी करतो, तू बाऊन्सर टाकले ते लक्षात ठेवेन अशाप्रकारे दोघांमध्ये बोलणंही सुरू होतं. तर हर्षितचा एक चेंडू स्टार्कच्या हेल्मेटलाही लागला. पण अखेरीस हर्षितनेच स्टार्कला बाद केलं. यात विराट कोहलीचं मोठं योगदान होतं.

कोहलीनेही या युवा गोलंदाजाला मिचेल स्टार्कला बाद करण्यासाठी मैदानात मदत केली. त्याने षटक सुरू होण्यापूर्वी हर्षितला सांगितलं की बाऊन्सरसाठी फिल्ड सेट कर आणि त्यानंतर हर्षितने बाऊन्सरसाठी फिल्ड सेट केली, त्यानंतर हर्षितच्या चेंडूवर मोठा फटका मारायला गेला आणि चेंडू हवेत उंच गेला अन् पंतने झेल टिपत ऑस्ट्रेलियाचा डाव उधळून लावला.