Virat Kohli Revealed about RCB captaincy: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या मोसमानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. याबाबत आता विराट कोहलीने एक महत्वाचा खुलासा आहे. विराट कोहली म्हणाला की त्याने स्वतःवरचा ‘आत्मविश्वास’ गमावला होता आणि त्यासाठीचा ‘जज्बा’ पण कमी झाला होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ २०१७ मध्ये आणि पुन्हा २०१९ मध्ये आयपीएल गुणतालिकेत तळाशी होता.
कोहलीने भारतीय टी-२० संघाची कमान सोडल्यानंतर २०२१ च्या हंगामात आरसीबीचे कर्णधारपदही सोडले होते. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस संघाचा कर्णधार झाला. महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध आरसीबीच्या सामन्यापूर्वी कोहलीने महिला खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी संघातील खेळाडूंना सांगितले की, “जेव्हा माझा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत होता, खरे सांगायचे तर, मला स्वतःवर फारसा आत्मविश्वास नव्हता. त्याबद्दल माझ्या मनात कोणतीही भावना उरली नव्हती.”
तो पुढे म्हणाला, “हा माझा स्वतःचा दृष्टीकोन होता, एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला सांगत होतो की, मी पुरेसे चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे आता मी सांभाळू शकत नाही.” आरसीबीचा संघ २०१६ नंतर प्रथमच २०२० मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचला. पुढच्या दोन मोसमातही त्याची पुनरावृत्ती करण्यात संघाला यश आले, पण विजेतेपद मिळवता आले नाही.
हेही वाचा – LLC 2023: सुरेश रैना आणि हरभजन सिंगने नाटू-नाटू गाण्यावर धरला ठेका; VIDEO होतोय व्हायरल
तो म्हणाला, “पुढच्या हंगामात (२०२०), नवीन खेळाडू संघात सामील झाले, त्यांच्याकडे नवीन कल्पना होत्या आणि ही आणखी एक संधी होती. ते खूप उत्साही होता, वैयक्तिकरित्या कदाचित मी तितका उत्साही नव्हतो, पण त्याच्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला सलग तीन वर्षे प्लेऑफमध्ये पोहोचवले.”
भारतीय संघाचा हा माजी कर्णधार म्हणाला, “आम्ही प्रत्येक हंगामाची सुरुवात पूर्वीप्रमाणेच उत्साहाने करतो. मला अजूनही उत्साह वाटतो. संघाला यश मिळवून देणे ही सामूहिक जबाबदारी आहे, जर कोणाचा आत्मविश्वास कमी असेल तर इतर खेळाडू त्याला प्रोत्साहन देतात.”