यूएईमधील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने निराशा केली असली तरी याच स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सूर गवसला. त्याने या स्पर्धेत धडाकेबाज फलंदाजी केली. विशेष म्हणजे याच स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानविरोधात खेळताना त्याने साधारण तीन वर्षांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१ वे शतक झळकावले. कोहलीच्या या खेळीची चांगलीच चर्चा झाली. याच सामन्यादरम्यान विराटने एका पाकिस्तानी फॅनला बॅटवर दिलेली सहीचीही चांगलीच चर्चा होत आहे. या बॅटची किंमत आता लाखो रुपये झाली आहे.

हेही वाचा >>> PAK vs SL Final Match : आज श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला! कोण कोरणार ट्रॉफीवर नाव? जाणून घ्या Playing 11

आशिया चषक स्पर्धेत ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली चांगलाच तळपला. त्याने या सामन्यात ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा केल्या. पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत तो मैदानावर टिकून होता. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे ७१ वे शतक होते.

हेही वाचा >>> भारताचं बळ वाढणार! टी-२० विश्वचषकासाठी ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू परतणार

तबब्ल तीन वर्षांनी विराटने शतकी खेळी केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानी फॅनला बॅटवर एक दिली. या पाकिस्तानी नागरिकाचे नाव सलाऊद्दीन असे आहे. विराटच्या सहीमुळे या बॅटला आता लाखो रुपयांची किंमत आली आहे. सलाऊद्दीद यांना एका माणसाने ही बॅट साधारण १ लाख रुपयांना मागितली होती. मात्र सलाऊद्दीनने बॅट विकण्यास नकार दिला.

हेही वाचा >>> उर्वशी रौतेलाचं पाकिस्तानी खेळाडूसोबत जोडलं जातंय नाव; चर्चेला उधाण आल्यानंतर दिलं स्पष्टीकरण; म्हणाली “माझ्या…”

विशेष म्हणजे या बॅटच्या बदल्यात कोणी मला १ कोटी रुपये दिले तरीही मी ही बॅट विकणार नाही, असे सलाऊद्दीन यांनी सांगितले आहे. सलाऊद्दी यांच्याकडे साधारण १५० बॅट्सचा संग्रह आहे आहेत. या सर्वच बॅट्स विशेष आहेत. त्याच्याकडे शाहीद आफ्रिदी, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इम्रान खान असा दिग्गज क्रिकेटपटूंनी सही केलेल्या बॅट आहेत. त्यामुळे त्याने विराटची सही केलेली बॅट विकण्यास नकार दिला आहे.

Story img Loader