Virat Kohli Hugged by Female Fan Video: इंग्लंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया आता कटकहून अहमदाबादला पोहोचली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना १२ फेब्रुवारीला होणार आहे. भारतीय संघाचे एअरपोर्टवरील विविध व्हीडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान विराट कोहलीचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअरपोर्टवर एक महिला चाहती विराटला मिठी मारताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत वि. इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम इथे होणार आहे. भारतीय संघाने सुरूवातीचे दोन सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. विराट कोहली इंग्लंडविरूद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यातून गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर झाला होता.

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील फक्त एक सामना खेळला आहे आणि त्यातही त्याची बॅट शांत होती. नागपूरातील सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो खेळला नाही. दुसऱ्या सामन्यासाठी तो फिट झाला आणि खेळतानाही दिसला. कटकमध्ये रोहित शर्माची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली, पण विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो ८ चेंडूत ५ धावा करत माघारी परतला.

भारतीय संघ आणि विराट कोहली ओडिसातील भुवनेश्वर विमानतळावर पोहोचल्यावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला चाहतीने विमानतळावरच विराट कोहलीला मिठी मारली आहे. व्हिडिओमध्ये विराट कोहली बॅग घेऊन विमानतळाच्या आत येत असल्याचे दिसत आहे, त्यादरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विराट कोहलीची नजर चाहत्यांकडे गेली आणि तो चाहत्यांच्या इथे जातो.

कोहली तिथे उभ्या असलेल्या एका महिला चाहतीच्या दिशेने जातो आणि तिला मिठी मारतो. थोडावेळ थांबल्यानंतर कोहली पुन्हा संघासह आतमध्ये जातो. यादरम्यान तिथे सर्व चाहते कोहली कोहलीचा एकच जयघोष करत होते. विराट कोहली वयस्कर असलेल्या महिला चाहतीला भेटल्यानंतर हसतो आणि आपल्या बॅग घेऊन पुढे निघतो. विराटला चाहत्यांच्या इथे गेलेले पाहता सर्वच जण त्याला भेटण्यासाठी एकच गोंधळ घालू लागतात.

विराट कोहली गेल्या काही काळापासून फॉर्मच्या शोधात आहे. अहमदाबादच्या मैदानावरील वनडे सामना चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी दुबईला रवाना होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या १९ फेब्रुवारीला सुरू होणार आहे.