Virat Kohli Meets Childhood Friend: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली तब्बल १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्लीचा संघ ३० जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यात रेल्वे संघाविरूद्ध खेळणार आहे. दरम्यान विराट कोहली अरूण जेटली स्टेडियममध्ये मंगळवारी सरावासाठी पोहोचला. यादरम्यान त्याने संघाबरोबर सराव केला तर त्याच्या काही जु्न्या मित्रांनाही तो भेटला. त्याचा अंडर-१५ आणि अंडर-१७ संघातील मित्राने आणि त्याच्या लेकाने त्याची भेट घेतली, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली अरूण जेटली स्टेडियमवर रणजी सामन्यापूर्वीच्या सरावासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्टेडियमबाहेर मीडियाने प्रचंड गर्दी केली होती. विराट कोहली त्याच्या कारने स्टेडियमला पोहोचला. विराटला त्याच्या अंडर-१६ क्रिकेटपासून ओळखणारे दिल्ली संघाचे मॅनेजर महेश भाटी यांनी त्याचं स्वागत केलं आणि तितक्यात विराटने मजेशीर विनोद केल्याने दोघंही खळखळून हसताना दिसले. विराट कोहली सरावासाठी मैदानात उतरला तेव्हा संघ फुटबॉलचा सराव करत होता.

भारतीय संघाचा भाग राहिलेला नवदीप सैनी आणि आरसीबीकडून एक सीझन खेळणार हिम्मत सिंग हे दोनच चेहरे विराटच्या परिचयाचे होते. इतर सर्व खेळाडूंची भेट घेत विराटनेही त्यांच्याबरोबर सरावाला सुरूवात केली. त्यानंतर विराटने फुटबॉल खेळल्यानंतर नेटमध्ये बराच सराव केला. यादरम्यान स्टेडिमयबाहेरून विराटचं स्केच हातात घेऊन एक मुलगा उभा होता. हा आठ वर्षांचा मुलगा विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलेल्या माजी क्रिकेटपटू शावेज खानचा मुलगा होता.

विराट कोहली रणजी सामन्यापूर्वी सराव करतानाचा फोटो (EXPRESS PHOTO BY PRAVEEN KHANNA )

शावेज खान याने अंडर-१६ आणि अंडर-१९ क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून विराट कोहलीबरोबर खेळला होता. शावेज खान ज्याचं आता दिल्लीमध्ये स्पोर्ट्स शॉप आहे. त्याच्या लेकाने शावेजला विचारलं, “बाबा विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे का”, यावर शावेज म्हणाला, “त्याचा सराव झाला की तो आपल्याला भेटेल.”

शावेजने म्हटल्याप्रमाणे विराट कोहलीने सराव झाल्यानंतर ग्लोव्ह, पॅड बाजूला ठेवत जोरात शावेज म्हणून आवाज दिला. विराटने शावेजला आवाज दिलेला पाहताच त्याचा लेक आश्चर्यचकित झाला. भविष्यात क्रिकेटपटू होणाऱ्या असंख्य मुलांचा आदर्श असलेला विराट आपल्या वडिलांचा मित्र असलेला पाहून त्याचा लेक कबीर खूपच चकित झाला. तितक्यात शावेजने येताच विराटने त्याला घट्ट मिठी मारली. तितक्यात विराटने मॅनेजर भाटी यांना आवाज देत शावेजच्या पाठीवर थाप मारत गप्पांना सुरूवात केली.

आपल्या जुन्या मित्राला भेटल्यानंतर शावेजच्या लेकाने कबीरने विराट कोहलीबरोबर फोटो काढला आणि त्याने काढलेल्या विराटच्या स्केचवर त्याचा ऑटोग्राफ घेतला. विराटची भेट घेतल्याने अवघ्या काहीच मिनिटात कबीर एक स्टार झाला आणि सर्व मीडियाने त्याचे बाईट घेण्यास सुरूवात केली. दरम्यान शावेज खानने काय बोलणं झालं याबाबत उलगडा न करता जुन्या गोष्टींवर गप्पा मारल्याचे म्हटले.

शावेजचा मुलगा कबीरने विराटशी त्याने काय गप्पा मारल्या याबाबत सांगितलं, आठ वर्षीय कबीर म्हणाला, “मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे, त्यासाठी मला काय काय करावं लागेल? विराटने त्याला सांगितलं, तुला खूप सराव कराव लागेल आणि सराव करण्यासाठी तुझ्या वडिलांना तुला सांगण्याची दरज लागली नाही पाहिजे. तू वडिलांना सांगितलं पाहिजे की मला सरावाला जायचं आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli hugs childhood friend shawez khan during ranji trophy practice in delhi his son got shocked bdg