Virat Kohli in IND vs PAK Match Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रविवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावलं आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. यासह त्याने स्वत:चं शतकही पूर्ण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटच्या विजयी व शतकी चौकारानंतर जगभरातील भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतात अनेक ठिकाणी चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला विजय साजरा केला. दरम्यान, विराट कोहलीच्या चाहत्यांनी देखील त्यांचा आनंद व्यक्त केला. विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातही त्याचे चाहते असून काल विराटने शतक पूर्ण केल्यानंतर या पाकिस्तानमधील चाहत्यांनी देखील एकच जल्लोष केला. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये काही सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून भारत-पाकिस्तान सामना दाखवला जात होता. त्यापैकी एका ठिकाणी सामना पाहण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांपैकी काहींनी विराटच्या शतकानंतर जल्लोष केला. ‘कोहली… कोहली…’ अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमधील पत्रकार मुहम्मद फैजान अस्लम खान यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. अर्सियन नसीर यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की “आमच्या लोकांची मानसिक स्थिती विचित्र आहे. इथे काही लोक विराट कोहलीचं शतक व्हावं म्हणून त्याला चिअर करत होते”. या पोस्टवर कमेंट करत मुहम्मद फैजान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

भारत उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघाने आपल्या विजयासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपली जागा जवळपास पक्की केली आहे. याशिवाय भारतीय संघ अ गटाच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. प्रथम भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळ करत पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत सामना जिंकला.