टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा जगातील महान क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेनंतर विराट कोहली विश्रांती घेत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून तो परतणार आहे. या मालिकेपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत, ज्याबद्दल चाहते विविध अंदाज लावत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुभवी फलंदाज विराट कोहलीने १० जानेवारीपासून (मंगळवार) श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी एक तात्विक पोस्ट शेअर केली आहे. बॉलीवूड अभिनेता इरफान खानच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. दिवंगत अभिनेते इरफानने प्रसिद्धीला आजार म्हटले होते. कोहलीने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये इरफानच्या या प्रसिद्ध विधानाचा उल्लेख केला आहे.

विराट कोहलीने इरफान खानची काढली आठवण

कोहलीने इरफानच्या फोटोसोबत लिहिले की, “प्रसिद्धीची इच्छा हा एक आजार आहे आणि एक दिवस मला या आजारापासून मुक्त व्हायला आवडेल. मला या इच्छेपासून मुक्त व्हायचे आहे. जिथे प्रसिद्धीला काही फरक पडत नाही. जिथे फक्त आयुष्याचा अनुभव घेणे आणि सतत आनंदी असणे पुरेसे आहे.कोहलीने इंस्टा स्टोरीमध्ये हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.”

हेही वाचा: IND vs SL: “भाई ने मुझे बोला कि…”, अक्षर पटेलने कर्णधार हार्दिकला त्याच्या उकृष्ट फलंदाजीमागील यशाचे दिले श्रेय

हँक्स व्हिडिओमध्ये म्हणतो, “जर मला माहित असते की हे वेळ देखील निघून जाईल. तुला आत्ता वाईट वाटत आहे का? तुम्हाला राग येतोय का? तुम्हाला राग येतोय का आणि कशासाठी? हे सुद्धा एक दिवस निघून जाईल. हे सर्व विचार करणे सोडून दिल्यावर मग तुम्हाला खूप छान वाटत आहे. आपल्याला वाटते की आयुष्यातील जीवनाची सर्व उत्तरे माहित आहेत.” विराट कोहलीने तात्विक संदेश शेअर केल्यानंतर, त्याचे चाहते विविध अंदाज लावत आहेत आणि त्याचा सध्याचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

विराट कोहलीने इंस्टाग्रामवर ही कथा का पोस्ट केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही,. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत आहे. यापूर्वी त्याने पत्नी अनुष्का शर्मासोबतच्या सुट्टीतील फोटो शेअर केले होते. बांगलादेश दौऱ्यापासून कोहली ब्रेकवर आहे. श्रीलंकेतील टी२० मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. कोहली नुकताच पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासह वृंदावनला गेला होता. बाबा नीम करोली आश्रमात पोहोचल्यानंतर त्यांनी आशीर्वाद घेतले. कोहली आणि अनुष्का हे बाबा नीम करोली महाराजांचे भक्त आहेत.

हेही वाचा: Suryakumar Century: “भाऊ बहुत सारा प्यार…” किंग कोहलीच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारने दिला गोड रिप्लाय, Video व्हायरल

कोहली लवकरच क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या उर्वरित सहकाऱ्यांसोबत सामील होण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो टीम इंडियाचा भाग आहे. या मालिकेतील पहिला सामना १० जानेवारीला होणार आहे. केवळ कोहलीच नाही तर कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे दिग्गज देखील या मालिकेतून पुनरागमन करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli instagram virat kohli remembers irrfan khan wrote desire for fame is a disease i want to get away from it avw