Former Pakistan Captain Salman butt lauds on Virat Kohli: पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट्ट म्हणाला की, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा तरुण नवोदित क्रिकेटपटूंसाठी एक आदर्श आहे. तसेच कोहली सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात फिट क्रिकेटर आहे. कोहलीने क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या दमदार कामगिरीने तो खेळाप्रती असलेल्या किती वचनबद्ध आहे हे दाखवून दिले आहे.

कोहली म्हणजे संपूर्ण ज्ञान देणारी एक संस्था आहे.

बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनलवर कोहलीबद्दल विस्तृतपणे सांगितले आहे. तो पुढे म्हणाला की, “विराट कोहलीच्या तंदुरुस्तीचा विचार केला असता, तो त्याचा खेळ उत्तम प्रकारे सुरू ठेवू शकतो. तो धावांचा रतीब घालत आहे, आणि तो केवळ गरजे इतकाच तंदुरुस्त नाही तर जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे. किंग कोहली म्हणजे ज्ञान-अनुभवाचे भांडार आहे, तो क्रिकेटविषयी संपूर्ण ज्ञान देणारी एक संस्थाच आहे. त्याची कारकीर्द तरुणांसाठी एक रोडमॅप आहे. मग तो त्याचा आहार असो, वचनबद्धता, दबावाखाली उत्तम कामगिरी करणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
Virat Kohli Birthday Special These five cricketers including
Virat Kohli Birthday : विराट कोहलीसह ‘या’ पाच दिग्गज क्रिकेटपटूंचा एकाच दिवशी असतो वाढदिवस, पाचही आहेत एकापेक्षा एक
Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Anushka Sharma Wishes Virat Kohli on 36th Birthday with 1st Photo of Son Akay and Vamika with him on Instagram
Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट
Mohammad Kaif says Every club has bowlers like Ajaz Patel
Mohammad Kaif : ‘एजाज पटेलसारखे गोलंदाज प्रत्येक क्लबमध्ये सापडतील…’, मुंबईतील पराभवानंतर मोहम्मद कैफ टीम इंडियावर संतापला

हेही वाचा: Harmanpreet Kaur: स्टंपवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला पडले महागात, आयसीसीने ठोठावला ‘हा’ दंड

भारताला सहज विजय मिळू शकतो

सलमान बट्ट पुढे म्हणाले की, “सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज भारताला कठीण लढत देण्यात अपयशी ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या संघामध्ये प्रतिभावान फलंदाज असले तरी ते सध्या चांगले खेळत नाहीत. दुसऱ्या कसोटीत यजमानांना चांगली धावसंख्या उभारावी लागेल अन्यथा भारताला पुन्हा एकदा आरामात विजय मिळेल.”

हेही वाचा: Harmanpreet Kaur: हरमनप्रीतने केलेल्या कृतीवर बांगलादेशच्या कर्णधाराची खोचक टीका; म्हणाली, “वागण्या-बोलण्याचे भान…”

भारताची गोलंदाजी मजबूत आहे

आतापर्यंत सामन्यात एकतर्फी वर्चस्व राहिल्याचे बट्ट म्हणाला, “भारत वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना जणू एका लहान संघाविरुद्ध खेळत आहे असेच दिसत आहे. जर वेस्ट इंडिजने ३५० किंवा ३७५ धावांपर्यंत मजल मारली तरच आम्हाला काही स्पर्धात्मक खेळ पाहायला मिळेल. भारताकडे चांगली गोलंदाजी असली तरी वेस्ट इंडिजकडे देखील टॅलेंट आहे, पण विंडीजचे फलंदाज कधी कधी असाधारण फटके खेळतात, ज्यामुळे ते लवकर बाद होऊन बाहेर पडतात आणि पॅव्हेलियनमध्ये परत जातात.