Virat Kohli is the main influence for adding cricket to olympics : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा आतापासून काही तासात संपणार आहे. १२ ऑगस्ट रोजी समारोप समारंभ आहे आणि खेळाडूंचे लक्ष आता लॉस एंजेलिस येथे खेळल्या जाणाऱ्या २०२८ ऑलिम्पिक गेम्सकडे वळले आहे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश आहे. १२० वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान मिळाले तेव्हाही एका ऑलिम्पिक अधिकाऱ्याने विराट कोहलीचा उल्लेख केला होता. आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समाप्तीपूर्वी हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहलीमुळे क्रिकेटचा ऑलिम्पिमध्ये समावेश –
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात विराट कोहलीचा बराच प्रभाव असल्याचे एका अधिकाऱ्याचे म्हटले होते. आता त्याचा व्हिडीओ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या समापन सोहळ्यापूर्वी हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लॉस एंजेलिस ऑलिम्पिक गेम्स २०२८ मध्ये बेसबॉल-सॉफ्टबॉल, लॅक्रोस, स्क्वॅश आणि फ्लॅघ फुटबॉलचा देखील समावेश केला आहे.
निकोलो कॅम्प्रियानी काय म्हणाले होते?
लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकचे क्रीडा संचालक निकोलो कॅम्प्रियानी म्हणाले होते, “मला वाटते की ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळांचा समावेश करण्यात विराटचा खूप प्रभाव आहे. ३४० दशलक्ष फॉलोअर्ससह (आता ३८५ दशलक्ष) सोशल मीडियावर तो जगातील तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारा ॲथलीट आहे. फॉलोअर्सच्या बाबतीत तो लेब्रॉन जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्स यांच्या पुढे आहे. लॉस एंजेलिस २०२८ ही विजयाची स्थिती आहे. क्रिकेट या पारंपारिक खेळाला राष्ट्रांच्या पलीकडे जागतिक मंचावर नेण्यासाठी आयओसीने ऑलिम्पिकमध्ये संधी दिली आहे.”
हेही वाचा – ६,६,६,६,६…Kieron Pollard तात्यांचा कहर! राशिद खानच्या एकाच षटकात ठोकले तब्बल ‘इतके’ षटकार, VIDEO व्हायरल
विराट कोहलीसाठी हा श्रीलंका दौरा एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ २० धावांवर बाद झाला. तसचे त्याआधी झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ २४ आणि १४ धावा केल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराटला या संपूर्ण मालिकेत फिरकीपटूंनी एलबीडब्ल्यू आऊट केले, हे त्याच्या कारकिर्दीत प्रथमच घडले आहे.
भारताने मालिका २-० ने गमावली –
श्रीलंकेविरुद्धची ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला २-० ने गमावावी लागली. श्रीलंका संघ १९९७ नंतर प्रथमच भारताविरुद्ध मालिका जिंकण्यात यशस्वी झाला. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर यजमान संघाने आपल्या भक्कम फिरकी गोलंदाजांच्या बळावर पुढील दोन एकदिवसीय सामने जिंकले.मालिकेच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ थोडा कमकुवत दिसत होता, त्यांचे अनेक गोलंदाज दुखापतीमुळे किंवा प्रकृतीच्या समस्येमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत, तर वानिंदू हसरंगा देखील मालिकेच्या मध्यभागी दुखापतीमुळे बाहेर पडला होता. असे असतानाही श्रीलंकेच्या संघाने या मालिकेत भारताला एकही सामना जिंकण्याची संधी दिली नाही.