Virat Kohli won the Player of the Tournament award in World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) कांगारू संघाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. तसेच १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यानंतर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार’ देण्यात आला.
एकदिवसीय विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा’ पुरस्कार जिंकणारा कोहली हा भारताचा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी २००३ मध्ये सचिन तेंडुलकर आणि २०११ मध्ये युवराज सिंगने हा पुरस्कार जिंकला होता. यापैकी सचिन तेंडुलकर हा फायनलमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाचा सदस्य होता, तर युवराज सिंग विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.
विराटने ९५.६२ च्या सरासरीने केल्या विक्रमी ७६५ धावा –
या विश्वचषकात प्रत्येक भारतीय फलंदाजाने धावा काढण्याची तयारी दाखवली , ज्यामुळे भारताचा नेट रन रेट वाढण्यास मदत झाली. माजी कर्णधार विराट कोहलीने संघात मुख्य फलंदाजाची भूमिका बजावली. यामुळेच टीम इंडियाने मधल्या षटकांमध्ये जास्त विकेट गमावल्या नाहीत. विराटचा फॉर्म पाहण्यासारखा आहे आणि त्याने ९५.६२ च्या सरासरीने ७६५ धावा केल्या आहेत, जे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. या काळात त्याने तीन शतके आणि सहा अर्धशतकं झळकवली आहेत. ११३ धावा ही कोहलीची या विश्वचषकातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
हेही वाचा – IND vs AUS Final: सलग १० विजयांवर एक पराभव पडला भारी, फायनलमध्ये भारताकडून निर्णय घेण्यात झाली का चूक?
२०२३ च्या विश्वचषकात केले मोठे विक्रम –
विराट कोहलीने विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. कोहलीने सलग पाच वेळा ५० हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे, जो विश्वचषक स्पर्धेतील तिसरा आणि कोहलीने स्वतः दुसऱ्यांदा केला आहे. याशिवाय, या विश्वचषकात कोहलीने ९५.६२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, जो ५०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही खेळाडूचा दुसरा सर्वोच्च विक्रम आहे.