Virat Kohli jersey sold for 40 lakhs in KL Rahul charity auction : क्रिकेटर केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांनी नुकताच गरजू मुलांसाठी क्रिकेटपटूंच्या क्रीडा साहित्यांचा लिलाव आयोजित केला होता. राहुलला अनेक क्रिकेटपटूंकडून स्वाक्षरी केलेल्या क्रीडा वस्तू मिळाल्या होत्या, ज्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विप्ला फाउंडेशनसाठी आयोजित ‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ नावाच्या या लिलावात विराट कोहलीच्या जर्सीला सर्वाधिक बोली लावण्यात आली. विराटच्या जर्सीसमोर रोहित शर्मा आणि एमएम धोनीची बॅट फिकी पडली. त्यामुळे नक्की विराट कोहलीच्या जर्सीसाठी आणि इतर क्रीडा साहित्यांसाठी किती बोली लागली? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘क्रिकेट फॉर चॅरिटी’ नावाच्या या लिलावात विराट कोहलीच्या जर्सीने लिलावात धुमाकूळ घातला. कोहलीने राहुलला स्वाक्षरी असलेली वर्ल्ड कप जर्सी दिली होती, जी ४० लाख रुपयांना विकली गेली. त्याच्या हॅन्ड ग्लोव्हजला २८ लाख रुपये मिळाले. या लिलावातून केएल राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टीने विप्ला फाउंडेशनसाठी एकूण १.९३ कोटी रुपये जमा केले आहेत.

विराटच्या जर्सीने रोहित-धोनीच्या बॅटला टाकले मागे –

भारतात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. विराट-रोहितसारख्या दिग्गजांना भेटण्यासाठी चाहते आतुर असतात. जर त्यांच्या क्रीडा वस्तू चाहत्यांना मिळाले, तर ते स्वप्नापेक्षा कमी नसते. त्यामुळे केएल राहुलच्या लिलावात या महान क्रिकेटपटूंच्या क्रीडा साहित्यांवर मोठ्या प्रमाणात बोली लागली होती. मात्र, दरवेळप्रमाणे या वेळीही विराटने बाजी मारली. रोहित आणि धोनीच्या दोन बॅटही विराटच्या जर्सीला टक्कर देऊ शकल्या नाहीत. रोहितची बॅट २४ लाखांना विकली गेली, तर धोनीची बॅट १३ लाखांना विकली गेली. या दोघांच्या बॅटला मिळून एकूण ३७ लाख रुपये कमावले आहेत, जे विराटच्या जर्सीच्या किंमतीपेक्षा ३ लाख रुपये कमी आहेत.

हेही वाचा – Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…

लिलावातील सर्वात महागड्या वस्तू –

विराट कोहलीची जर्सी आणि हॅन्ड ग्लोव्हज, रोहित आणि धोनीच्या बॅटनंतर राहुल द्रविडच्या बॅटला ११ लाख रुपयेची बोली लागली. तर केएल राहुलची टीम इंडियाची टेस्ट जर्सी ११ लाख रुपये आहे. त्याच्या वर्ल्ड कप बॅटची किंमत ७ लाख रुपये मिळाले. याशिवाय जसप्रीत बुमराहच्या वर्ल्ड कप जर्सीला ८ लाख रुपये आणि ऋषभ पंतच्या आयपीएल बॅटला ७ लाख रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा – Shikhar Dhawan Retirement : टीम इंडियाच्या गब्बरला ‘मिस्टर आयसीसी’ का म्हटले जाते? जाणून घ्या

लिलावातील सर्वात स्वस्त वस्तू –

केएल राहुलच्या लिलावात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर निकोलस पूरनच्या आयपीएल जर्सीला सर्वात कमी किंमत मिळाली आहे. यासाठी केवळ ४५ हजार रुपयांची बोली लागली. याशिवाय युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांची आयपीएल जर्सी प्रत्येकी ५० हजार रुपयांना, तर जोस बटलरची आयपीएल जर्सी ५५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli jersey sold for 40 lakhs full details about charity auction conducted by kl rahul athiya shetty for needy children vbm