Virat Kohlis best time is over David Lloyd’s statement : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच कालावधीपासून फॉर्ममशी संघर्ष करताना दिसताना. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान, कोहली सतत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंना छेडत होता आणि वारंवार विकेट गमावत होता. सध्याच्या महान फलंदाजाची ही कमजोरी पाहून माजी क्रिकेटपटूंनी कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात डेव्हिड लॉईडने मोठं वक्तव्य केलं आहे.
डेव्हिड लॉईड विराटबद्दल काय म्हणाले?
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉईडनेही कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्यामागे कोहलीचा सर्वोत्तम काळ गेला आहे, असा त्याचा विश्वास आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते, मात्र त्यानंतर तो प्रत्येक डावात जवळपास त्याच पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याची कमजोरी पकडली होती आणि त्याला त्याच लाईन आणि लेन्थवर सतत गोलंदाजी केली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर कोहली काही काळ संयम दाखवत असे, पण नंतर त्याचा संयम सुटायचा आणि तो बाहेर जाणाऱ्या चेंडूंना छेडायचा आणि आपली विकेट गमावत होता.
विराट कोहलीचा सर्वोत्तम काळ संपला –
डेव्हिड लॉईड टॉकस्पोर्ट्स क्रिकेटवर म्हणाला की, “विराट कोहलीला माहित आहे की त्याचा सर्वोत्तम काळ संपला आहे. याचे त्याला दुख: होईल. जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये येईल, तेव्हा त्याचे लक्ष कुठे असेल हे तुम्हाला माहिती आहे. त्याची नजर ऑफ स्टंप आणि स्लिपमधील खेळाडूंवर असेल. वयाच्या ३६ व्या वर्षी, त्याला माहित आहे की त्याने काय करायला हवे. आम्ही पाहिलेल्या महान खेळाडूंपैकी तो एक आहे, परंतु त्याचा सर्वोत्तम काळ गेला आहे.”
हेही वाचा – R Ashwin : ‘मी अजून खेळू शकलो असतो, पण…’, निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर आर अश्विनचं मोठं वक्तव्य
गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची
डेव्हिड लॉईड पुढे म्हणाला, “प्रशिक्षक गौतम गंभीरची भूमिका महत्त्वाची असेल. कारण तो त्या ड्रेसिंग रूममध्ये आहे. त्याने वेळ गमावली आहे आणि त्याची वेळ संपली आहे. जेव्हा तुम्ही महान क्रिकेटपटूंबद्दल बोलता, तेव्हा एक गोष्ट जी बाकीच्यांकडे नसते ती म्हणजे वेळ. त्याने वेळ गमावला. तो निघून गेला. त्याची वेळ निघून गेली. वयाबरोबर प्रत्येकजण तुम्हाला ‘बॉल सोडा’ यांसारख्या गोष्टी सांगतात. तुम्ही एकाच प्रकारे वारंवार आऊट होत असाल, तर हे प्रत्येकासाठी संकेत आहे की वेळ गेली आहे.”