Yuvraj Singh Emotional Post For Virat Kohli: विराट कोहलीच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने सोशल मीडियावर अत्यंत खास पोस्ट लिहिली आहे. 50 व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) शतकाबद्दल युवराजने विराटचं कौतुक करताना विराट कोहलीच्या दिवंगत वडिलांचा खास उल्लेख केला. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मागे टाकून क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले.यावेळी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉलिवूड कलाकारांपासून ते संपूर्ण जगाने विराट कोहलीवर प्रेम व कौतुकाचा वर्षाव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, विराट कोहलीच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या युवराज सिंगने सुद्धा खास पोस्ट लिहून कोहलीला शुभेच्छा दिल्या. “५० शतके लगावत सचिन तेंडुलकरच्या पुढे गेलेल्या विराट कोहलीचे अभिनंदन! मला विश्वास आहे की विराट कोहलीच्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असेल. आकाशातून आपल्या मुलाला पाहताना त्यांना अत्यंत आनंद होत असेल. आज पुन्हा विराट कोहली या पिढीतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.” , असे युवराजने पोस्टमध्ये म्हटले आहे.

युवराज सिंगची विराट कोहलीसाठी पोस्ट पाहून चाहते भावुक

युवराज सिंगच्या या पोस्टखाली कमेंट करून अनेकांनी विराट कोहलीचे कौतुक केले आहेच. शिवाय काहींनी विराटच्या वडिलांचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. विराट लहान असतानाचा त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले होते. विराटचा हा पराक्रम प्रत्यक्ष बघणे त्याच्या वडिलांच्या नशिबात नव्हते हे दुःखद आहे असेही काहींनी कमेंटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा<< IND vs NZ: शतक श्रेयस अय्यरचं पण व्हायरल झाला रोहित शर्मा! Video बघून लोकं म्हणतात, “तू कधीही कोणालाही..”

कोहलीने ५० वे एकदिवसीय शतक न्यूझीलंड विरुद्धच्या अटीतटीच्या हाय व्हॉलटेज सेमीफायनल सामन्यात पूर्ण केले. कोहलीच्या आठ चौकार आणि एक षटकाराच्या खेळीमुळे भारताला ३९७ धावांचा डोंगर उभारण्यास मदत झाली. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीविषयी एका पॉडकास्टमध्ये बोलताना युवराजने “मी सध्या विराटला त्रास देत नाही तो कामात गुंतलेला आहे, जेव्हा तो ‘चिकू’ होता तेव्हा गोष्ट वेगळी होती आणि आता तो विराट कोहली आहे” असे म्हटले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli late father emotional post by yuvraj singh says congratulates to kohli 50th odi hundred ind vs nz match highlights svs