आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे. त्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० असा विजय मिळवावा लागेल. भारत संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला त्यात सुधारणा करण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे.
फलंदाजीतही आफ्रिकेची बाजू वरचढ आहे. एबी डीव्हिलियर्स आणि हशिम अमला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या, तर फा डू प्लेसिस १६व्या स्थानावर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली १३व्या, चेतेश्वर पुजारा १९व्या आणि मुरली विजय २०व्या स्थानावर आहेत. गोलंदाजीत आर अश्विनने अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेत त्याची भूमिका महत्त्वाची आहे. गोलंदाजीत डेल स्टेन अव्वल स्थानावर असून वेर्नोन फिलेंडर आणि मोर्ने मॉर्केल अनुक्रमे सातव्या व ११व्या स्थानावर आहेत. अश्विन या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.
भारताला कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी
आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे.
First published on: 04-11-2015 at 03:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli led india eye second spot in icc test rankings