आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे. त्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४-० असा विजय मिळवावा लागेल. भारत संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला त्यात सुधारणा करण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे.
फलंदाजीतही आफ्रिकेची बाजू वरचढ आहे. एबी डीव्हिलियर्स आणि हशिम अमला अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या, तर फा डू प्लेसिस १६व्या स्थानावर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली १३व्या, चेतेश्वर पुजारा १९व्या आणि मुरली विजय २०व्या स्थानावर आहेत. गोलंदाजीत आर अश्विनने अष्टपैलू खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेत त्याची भूमिका महत्त्वाची आहे. गोलंदाजीत डेल स्टेन अव्वल स्थानावर असून वेर्नोन फिलेंडर आणि मोर्ने मॉर्केल अनुक्रमे सातव्या व ११व्या स्थानावर आहेत. अश्विन या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा