Virat Kohli Viral Post Shocks Fans: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतासाठी विराट कोहली कायमचं एक महत्त्वाचा खेळाडू समजला जातो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. या सगळ्यामध्ये विराट कोहलीची एक सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. २० नोव्हेंबरला विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढले. या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीने एक्सवर व्हाईट ब्रॅकग्राऊंड आणि त्यावर साधा फॉन्टमध्ये मोठी माहिती असलेली एक पोस्ट केली. सहसा अशा पोस्ट महत्त्वाची घोषणा करण्यासाठी केल्या जातात. विराट कोहलीची ही पोस्ट अगदी शेवटच्या ओळींमध्ये नेमकी काय आहे याचा उलगडा होता. तोपर्यंत विराट कोहलीची ही पोस्ट निवृत्तीची असल्याची भिती चाहत्यांच्या मनात दाटून आली.
विराटने त्याच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी एक पोस्ट केली होती, पण चाहत्यांना ही पोस्ट कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा असल्याचे वाटले. त्याचवेळी विराटने पत्नी अनुष्का शर्माला घटस्फोट दिल्याचे काही चाहत्यांना वाटले. विराटने जेव्हा कसोटी फॉर्मेटचे कर्णधारपद सोडले तेव्हा त्याने सोशल मीडियावर केवळ पांढऱ्या बॅकग्राऊंडवर साधा मजकूर लिहून घोषणा केली होती. त्यामुळे विराटने कसोटीतून निवृत्तीची घोषणा तर नाही केली ना अशी भिती चाहत्यांना वाटत होती.
हेही वाचा – IND vs AUS: शुबमन गिलच्या दुखापतीबाबत कोचचे मोठे अपडेट, फ्रॅक्चर असतानाही पहिली कसोटी खेळणार?
विराटने या पोस्टमध्ये त्याचा ब्रँड व्रॉगनबद्दल लिहिले आहे. या ब्रँडशी जोडल्यापासून ते १० वर्षांच्या या प्रवासाबाबत विराटने या पोस्टमध्ये लिहिले. पण चाहत्यांनी पूर्ण पोस्ट वाचण्याआधीच कमेंट्सचा पाऊस पाडत चिंता व्यक्त केली. चाहत्यांनी विराट कोहलीची ही पोस्ट पूर्ण वाचली नाही आणि कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी निवृत्ती’. एका चाहत्याने लिहिले, ‘मला मिनी हार्ट अटॅक दिला.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘या प्रकारे लोक तुमच्या रिटायरमेंट पोस्टला प्रमोशनल पोस्ट मानतील, तुमचा मॅनेजर/फॉन्ट/पार्श्वभूमी बदला.’
विराट कोहलीच्या या पोस्टचा संबंध चाहत्यांनी त्याची पत्नी अनुष्का शर्माबरोबर जोडण्यास सुरुवात केली. विराट कोहली आणि अनुष्का वेगळे होत असल्यांच्या चर्चांना उधाण आले होते.
© IE Online Media Services (P) Ltd