यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील आज (८ सप्टेंबर) भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने दमदार शतकी खेळी केली. त्याने एकट्याने तब्बल १२२ धावा करत अफगाणिस्तान संघाला जेरीस आणले. दरम्यान या कामगिरीसाठी विराटला तब्बल १०२१ दिवसांची वाट पाहावी लागली. विराटचे हे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”

मागील बऱ्याच काळापासून विराट कोहली धावा काढण्यासाठी झुंजत होता. अनेक प्रयत्न करूनही त्याला धावा करता येत नव्हत्या. मात्र अखेर आज त्याने आपल्या कारकिर्दीतील ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात तब्बल १०२१ दिवसांनी त्याने ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे धावा करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती. विराटने काही दिवसांसाठी आराम करावा असा सल्लाही दिला जात होता. मात्र आता तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना दिसत असून त्याची प्रचिती आज आली आहे. त्याने आपले शतक ११ चौकार आणि चार षटकार लगावत पूर्ण केले. आपल्या पूर्ण खेळीत त्याने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत १२२ धावा केल्या.

हेही वाचा >> Virat Kohli Century : विराटची अफाट कामगिरी! अफगाणिस्तानविरोधात झळकावलं ७१वं शतक

दरम्यान, याच महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेळा सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले आहे. विराटने हाच खेळ कायम ठेवत टी-३० विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विराटचे आजचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक असून सचिन तेंडुलकरच्या शतकांची संख्या १०० आहे. तसेच रिकी पॉँटिंगच्या शतकांची संख्या ७० आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli made century after nearly two years in ind vs afg asia cup match prd