आशिया चषक स्पर्धेत आज भारत-हाँगकाँग यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात भारताचा विराट कोहली चांगलाच तळपला. मागील अनेक दिवसांपासून कोहली आपली जादू दाखवू शकला नव्हता. मात्र आजच्या सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत शानदार अर्धशतक झळकावले.

हेही वाचा >>> अफगाणिस्तानच्या आगामी सामन्याआधी उमर गुलच्या पत्नीने केली खास विनंती, म्हणाली “पाकिस्तानविरोधात…”

विराट कोहलीने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील टी-२० सामन्यांमधील ३१ वे अर्धशतक झळकावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आला. मैदानात उतरताच त्याने सुरुवातीपासून मोठे फटके मारायला सुरुवात केली. त्याने ४० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल हंगामातही विराटने निराशा केली होती. मात्र आजच्या सामन्यात त्याच्या बॅटने कमाल केली. त्याने ४४ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि एक चौकार लगावत ५९ धावा केल्या. त्याच्या या धावसंख्येमुळेच भारताला १९२ धावसंख्या गाठता आली.

हेही वाचा >> क्रिकेटचा देव पुन्हा एकदा बॅट हातात घेणार, सचिन तेंडुलकर ‘या’ क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची शक्यता

विराट कोहलीसोबतच सूर्युकमार यादवनेही नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने अखेरच्या सहा चेंडूमध्ये चार षटकार लगावले. त्याने अवघ्या २६ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. आपल्या या खेळीमध्ये त्याने सहा षटकार आणि सहा चौकार लगावले. विराट कोहलीसारखचा तोही शेवटपर्यंत नाबाद राहिला.