‘डबस्मॅश’ या हटके अॅपने सध्या धुमाकूळ घातलाय. बॉलीवूडचे तारे, गायक, खेळाडू अशा सगळ्यांनाच या ‘डबस्मॅश’चे वेड लागले आहे. भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीला देखील डबस्मॅशचा मोह आवरता आला नाही. झिम्बाब्वे दौऱयासाठी आराम देण्यात आलेल्या विराटने यावेळी फावल्या वेळेत मित्र संदीप राजसोबत ‘हेराफेरी’ चित्रपटातील अभिनेते परेश रावल यांच्या लोकप्रीय संवादाचा डबस्मॅश व्हिडिओ चित्रीत केला आहे. ‘ये बाबुराव का स्टाईल है..’ हा परेश रावल यांचा गाजलेला संवाद विराट कोहली आपल्या अंदाजात सादर करताना दिसतो. विराटचा डबस्मॅश व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच ट्रेंडमध्ये आहे.
.