तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर २०३ धावांनी मात केली. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना गुरुदक्षिण म्हणून एक भेट दिली आहे. सामनावीराच्या किताबात मिळालेली शँपेनची बॉटल कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये जात शास्त्री यांना भेट दिली. पहिल्या दोन कसोटींमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही प्रशिक्षक रवी शास्त्री कोहलीच्या मागे खंबीर उभे होते, याबद्दल आभार मानण्यासाठी कोहलीने शास्त्रींना शँपेन दिल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने विजयाचं जोरदार सेलिब्रेशन करण्याचं टाळलं. भारतीय संघातील खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करत मैदानाबाहेर जाणं पसतं केलं. ट्रेंट ब्रिज कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा एका कसोटी सामन्यातला विजय असून, मालिकेतले २ सामने अजुन शिल्लक असल्याने कोहली-शास्त्री यांनी संघाला स्वतःवर ताबा ठेवण्यास सांगितलं. पाचव्या दिवसाच्या अखेरीस भारताला विजयासाठी अवघ्या एका विकेटची गरज होती. रविचंद्रन आश्विनने जेम्स अँडरसनचा अडथळा दूर करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.