रॉजन फेडरर, आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व.. क्रीडा जगतासाठी आदर्शवत.. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही लाडका.. या दोन महान क्रीडापटूंची भेट विम्बल्डनमध्ये होतेच, पण ब्रिस्बेन खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने फेडररला भेटण्याचा योग आला तो भारताचा नवनिर्वाचित कसोटी कर्णधार विराट कोहलीला. कोहलीच्या खात्यामध्ये भरपूर धावा असल्या तरी महानता म्हणजे काय, हे कोहलीला फेडररला भेटल्यावर पुन्हा एकदा समजले. ‘‘हा दिवस आयुष्यात मी कधीही विसरू शकत नाही. कोर्टवरील आणि कोर्टबाहेरही फेडरर तेवढाच महान मला वाटला, खराखुरा महान,’’ असे कोहलीने ट्विटरवर म्हटले आहे. ब्रिस्बेन खुली टेनिस स्पर्धा जिंकत फेडररने एक हजारावे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर कोहलीबरोबरच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथनेही त्याची भेट घेतली.
फेडररच्या भेटीने कोहली भारावला
रॉजन फेडरर, आंतरराष्ट्रीय टेनिस विश्वातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व.. क्रीडा जगतासाठी आदर्शवत.. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही लाडका..
First published on: 13-01-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli meets roger federer