Virat Kohli Mimics Jasprit Bumrah Bowling Action Video Viral IND vs BAN: भारत-बांगलादेशमधील कानपूर कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. पाऊस असल्याने पहिले सत्र खेळवले गेले नाही. तर कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळही लंच ब्रेकनंतर थांबवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून टीम इंडिया क्षेत्ररक्षणासाठी उतरली. यादरम्यान विराट कोहलीने जसप्रीत बुमराहची नक्कल केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाने गोलंदाजी सुरू करण्यापूर्वी विराट कोहलीने जसप्रीत बुमराहची मैदानावर नक्कल केली. विराट कोहली त्याच्या बॉलिंग ॲक्शनची कॉपी करताना दिसला. विराटच नाही तर रवींद्र जडेजानेही बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभावही दाखवले. तर बाजूला यशस्वी जैस्वाल आणि सहाय्यक प्रशिक्षकही उभे होते.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू मैदानावर उतरले होते. यादरम्यान विराट कोहली जसप्रीत बुमराहची रनअप सुरू करण्याची स्टाईल सांगत होता, जे पाहून टीम इंडियाचे सर्व खेळाडू हसू लागले. यानंतर जडेजानेही तेच केले. विराट आणि जडेजाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोहली नेहमीच मैदानावर मजा मस्ती करत असतो, तर खेळाडूंची नक्कलही करताना दिसतो. यावेळेस त्याने बुमराहसमोर त्याची अगदी हुबेहुब नक्कल केली.

हेही वाचा – Musheer Khan: सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान रस्ते अपघातात जखमी, फ्रॅक्चर झाल्याने इराणी लढतीस मुकण्याची शक्यता

जसप्रीत बुमराहने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. पहिल्या डावात त्याने ५० धावा केल्या आणि ४ विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात त्याने १ विकेट घेतली. तर दुसऱ्या कसोटीत बुमराहला अजून एकही विकेट मिळालेली नाही. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने आतापर्यंत ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.

बांगलादेशचा सलामीवीर सलामीवीर झाकीर हसन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय शादमान इस्लाम ३६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हसन शांतोनेही अश्विनच्या जाळ्यात अडकला, त्याने ५७ चेंडूत ३१ धावा केल्या. मोमिनुल हक ८१ चेंडूत ४० धावा तर मुशफिकर रहीम १३ चेंडूत ६ धावा करत फलंदाजी करत आहे. आकाशदीपने २ तर आर अश्विनने १ विकेट घेतली आहे.