विश्वचषकानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कालावधी संपत असून त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल. या प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये कोहलीचाही सहभाग असावा, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी व्यक्त केले आहे.‘‘सध्याच्या घडीला कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. भविष्यामध्ये कोहलीकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचेही कर्णधारपद येऊ शकते. त्यामुळे जेव्हा आता नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, तेव्हा त्यामध्ये कोहलीचा सहभाग असायला हवा, असे जोन्स म्हणाले.

Story img Loader