Virat Kohli Naagin Dance Video IND vs BAN: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २८० धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. तर दुसरीकडे या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यान फार मोठी खेळी साकारू शकला नाही. ज्यामध्ये तो पहिल्या डावात केवळ ६ धावा आणि दुसऱ्या डावात १७ धावा करू शकला. पण यष्टीरक्षण करताना मात्र विराटने आपली १०० टक्के कामगिरी चोख बजावली. या सामन्यादरम्यानचा विराट कोहलीचा नागिन डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

विराट कोहलीने नागिन डान्स करत बांगलादेशला चिडवलं

विराट कोहली यष्टीरक्षण करत असताना दोन षटकांच्या दरम्यान नाचताना दिसतो किंवा खेळाडूंबरोबर मस्करी करत असतो. विराटचे नेहमीच सामन्यांमधील असे काही व्हीडिओ व्हायरल होताना दिसत असतात. तसाच एक विराट कोहलीचा बांगलादेशविरूद्धच्या कसोटीतील दुसऱ्या डावातील व्हीडिओ व्हायरल होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नागिन डान्सची पोझ देत बांगलादेश संघाला चिडवत असल्याचे चाहते म्हणत आहेत. रोहितच्या या नागिन डान्सचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा

नागिन डान्स आणि बांगलादेश संघाचं एक वेगळंच कनेक्शन आहे. जेव्हा जेव्हा बांगलादेशचा संघ एखादा सामना जिंकतो तेव्हा ते नागिन डान्स करून सेलिब्रेशन करतात जे खूप व्हायरलही झाले होते. आता कोहलीने तिच पोझ करत त्यांना चिडवले असल्याचे चाहते म्हणत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे.

हेही वाचा – IND vs BAN: विजयानंतर ऋषभ पंतविषयी बोलताना रोहित शर्मा झाला भावुक, म्हणाला, “त्या कठीण काळात…”

चेन्नई कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात विराट कोहलीची बॅट शांत होती. जानेवारी २०२४ नंतर कसोटी सामना खेळत असलेल्या कोहलीला दोन्ही डावात चांगली धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या कसोटीचा दुसरा डाव सुरू असतानाही विराट कोहली चेपॉक स्टेडियमच्या नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचा व्हीडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे आता कानपूर येथे होणाऱ्या या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे. विराट कोहलीने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे ज्यामध्ये तो केवळ २७ धावा करू शकला होता. भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli naagin dance video viral he mocks bangladesh with snake pose in ind vs ban chennai test bdg