गतवर्षी विराट कोहलीने आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली होती. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये गतवर्षी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ वर्षातील जागतिक एकदिवसीय संघाचा कर्णधार जाहिर केले आहे. विराट कोहली आणि बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या वर्षभरातील सर्वोत्तम ११ खेळाडूंच्या कसोटी आणि वनडे संघात स्थान मिळाले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवर्षात २०१८ चा सर्वोत्तम ११ खेळाडूंचा एकदिवसीय आणि कसोटी संघ निवडला आहे. या दोन्ही संघामध्ये विराट कोहलीची वर्णी लागली आहे. विराट कोहलीला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले आहे. तर कसोटी संघाच्या कर्णधारपदी न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची निवड केली आहे. या संघात २०१८ या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
विराट कोहलीने २०१८ मध्ये १४ वनडे सामन्यात सहा शतके आणि ३ अर्धशतकांसह १३३.४ च्या सरासरीने १२०२ धावा केल्या आहेत. कसोटीतही विराट कोहलीने एक हजारपेक्षा आधीक धावा केल्या आहे. एकदिवसीय संघात विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रुटसह जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर यांनाही संधी देण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा २०१८ चा एकदविसीय संघ –
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, जो रुट , विराट कोहली( कर्णधार), शिमरॉन हेटमेयर, जॉस बटलर (यष्टीरक्षक), थिसरा परेरा, रशीद खान, कुलदीप यादव, मुस्तफिजूर रेहमान, जसप्रीत बुमराह
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा २०१८ चा कसोटी संघ –
केन विलियम्सन (कप्तान), विराट कोहली, कुशल मेंडिस, टॉम लाथम, एबी डिविलियर्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, कगिसो रबाडा, नाथन लियोन, मोहम्मद अब्बास आणि जसप्रीत बुमराह.