Virat Kohli 36th Birthday and Networth: भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीचा आज म्हणजेच ५ नोव्हेंबरला ३६वा वाढदिवस आहे. जागतिक क्रिकेटमधील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराटने आपली ओळख निर्माण केली आहे. २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच विराट कोहलीने एकामागून एक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. एकहाती संपूर्ण सामना फिरवण्याची धमक असणाऱ्या विराटचे जगभरात करोडो चाहते आहेत. याच किंग कोहलीच्या लक्झरी राहणीमान, त्याची संपत्ती त्याचं कार कलेक्शन याचा आढावा आपण घेणार आहोत.

विराट कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Anushka Sharma Wishes Virat Kohli on 36th Birthday with 1st Photo of Son Akay and Vamika with him on Instagram
Virat Kohli Birthday: विराट, वामिका, अकाय…; अनुष्का शर्माने पहिल्यांदाच शेअर केला दोन्ही मुलांबरोबरचा फोटो, कोहलीच्या वाढदिवशी खास पोस्ट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut slams Raj Thackeray (1)
Sanjay Raut: ‘राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत’, प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

एकदिवसीय – १८ ऑगस्ट २००८ वि श्रीलंका
टी-२० – १२ जून २०१० वि झिम्बाब्वे
कसोटी – २० जून २०११ वि वेस्ट इंडिज

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

विराट कोहलीची संपत्ती

स्पोर्ट्सकीडा नुसार विराट कोहलीची एकूण संपत्ती अंदाजे १,०५० कोटी रुपये (अंदाजे १२७ मिलियन) आहे. २०२२ मध्ये, स्पोर्टिकोने त्याला सुमारे ३३.३ दशलक्ष डॉलर्स वार्षिक कमाईसह जगातील ६१वा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून स्थान दिले. विराटचं टॅलेंट आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, तो जगभरात सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू आणि जगातील टॉप १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत दिसणारा दुसरा आशियाई खेळाडू आहे यात आश्चर्य नाही.

हेही वाचा – Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

विराट कोहलीची सॅलरी (Virat Kohli Salary)

विराट कोहली क्रिकेटपटू म्हणून सर्वाधिक कमाई करतो. बीसीसीआयच्या करारानुसार विराट कोहलीला दरवर्षी ७ कोटी रूपये कमावतो. त्याचबरोबर आयपीएलमध्ये विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळतो. ज्यात त्याने २०२४ च्या हंगामात १५.२५ कोटी रूपये कमावले. तर आयपीएल २०२५ पूर्वी आरसीबीने त्याला तब्बल २१ कोटी रूपयांना रिटेन केलं आहे. स्पोर्ट्सकीडानुसार, सोशल मीडिया मार्केटिंग सॉल्यूशन प्लॅटफॉर्म हॉपर एचक्यूनुसार, विराट कोहली इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध असून तो प्रत्येक पोस्टसाठी ११.४५ कोटी रूपये आकारतो. विराट कोहली जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या २० मोठ्या नावांपैकी एक आहे.

हेही वाचा – टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्तीची केली घोषणा, ‘या’ टूर्नामेंटनंतर क्रिकेटला करणार अलविदा

Virat Kohli Birthday
विराट कोहली (फोटो-@imVkohli)

विराट कोहलीचे ब्रँड आणि बिझनेस (Virat Kohli Brands And Business)

ब्लू ट्राईब – वनस्पती-आधारित मांस तयार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक

रेज कॉफी

वन ८ कॉम्युन – रेस्टॉरंट

हायपरिस – हेल्थ प्रोडक्ट्स स्टार्टअप

चिसेल फिटनेस – फिटनेस सेंटर

डिजिट इन्शुरन्स

युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिज प्रायव्हेट लिमिटेड

व्रॉगन – फॅशन ब्रँड, जो आयपीएलमध्ये आरसीबीला स्पॉन्सर करतो

कॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड – गेमिंग स्टार्टअप

एफसी गोवा – इंडियन सुपर लीग फुटबॉल फ्रँचायझी

न्यूएवा (Nueva) रेस्टॉरंट

स्पोर्ट्स कॉन्वो – सोशल नेटवर्किंग स्टार्टअप

टीम ब्लू रायझिंग – E1 वर्ल्ड चॅम्पियनशिप इलेक्ट्रिक रेस बोट्स टीम

विराट कोहली ब्रँड व्हॅल्यू (Virat Kohli Brand Value)

शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांसारख्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ झाली आहे. क्रॉलच्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट २०२३ नुसार, त्याचे ब्रँड मूल्य २९ टक्क्यांनी वाढून अंदाजे रु. १,९०० कोटी पर्यंत पोहोचले आहे. सोशल आणि डिजिटल मीडियावर कोहलीच्या लोकप्रियतेमुळे तो भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी बनला आहे. रिपोर्ट्सनुसार, तो एका ब्रँड एंडोर्समेंटकरता ७.५ कोटी ते १० कोटी रुपये आकारतो, असे टाईम्स ऑफ इंडियाने अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा – IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

कोहलीच्या एंडोर्समेंट पार्टनरशिपच्या यादीमध्ये टूथसी, नॉईज, आवास लिव्हिंग, ब्लू ट्राइब, रेज कॉफी, फायर-बोल्ट, डिजिट इन्शुरन्स, विवो, वाइज, ग्रेट लर्निंग आणि यासारख्या प्रमुख ब्रँडचा समावेश आहे. त्याच्या एंडोर्समेंट्स यादीमध्ये Puma, Hero MotoCorp, Myntra, Mobile Premier League, Google Duo आणि Audi India सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचाही समावेश आहे.

विराट कोहलीचं कार कलेक्शन (Virat Kohli Car Collection)

विराट कोहलीच्या कार कलेक्शनच्या ताफ्यात एकापेक्षा एक उत्कृष्ट कार आहेत. ज्यामध्ये Lamborghini Huracan, an Audi A8L QW12 Quattro, an Audi R8 V10, an Audi R8 LMX Limited Edition, a Bentley Continental GT Mulliner, and a Bentley Flying Spur यासारख्या महागड्या कारचा समावेश आहे.

Story img Loader