क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहली याच्या नावाची शिफारस केली आहे. ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची शिफारस ‘बीसीसीआयने’ केली आहे. 
गेल्या वर्षी पुरस्काराचे नामांकन पाठविण्यावरून बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालय यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बीसीसीआयने गेल्या वर्षी ठरलेल्या वेळेत नामांकने पाठवली नव्हती. मात्र, यंदा बीसीसीआयने हा वाद टाळण्यात यश मिळवले.
भारतीय संघात 2012 या वर्षात विराट कोहलीने उत्तम खेळी केली होती. राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघाची मधली फळी कमकुवत झाली होती. मात्र, विराट कोहलीने उत्तम कामगिरी करत भारतीय संघातील मधल्या फळीतील आपले स्थान पक्के केले. 2012 या वर्षभरातील त्याच्या शैलीदार खेळाला अनुसरुन यंदाच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीची शिफारस केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा