भारतीय कर्णधार विराट कोहलीने शिखर धवन आणि ऋषभ पंतला चॅलेंज केले आहे. आता तुम्ही म्हणाल हे धावा काढण्याचे चॅलेंज असेल, पण हे चॅलेंज मैदानावरील नसून मैदानाबाहेरचे आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवसाला हटके वेशभूषा (कपडे) परिधान करण्याचे आगळेवेगळे चॅलेंज विराटने केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत स्वातंत्रा दिवस साजरा करणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराटसेना विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल. विराट कोहलीले आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने शिखर धवन आणि ऋषभ पंतला वेशभूषा परिधान करण्यासाठी नॉमिनेट केले आहे.
या व्हीडिओमध्ये विराट कोहलीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तो म्हणतोय, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ हा कोस्ट लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. जगभर फिरलो तरी काही गोष्टी आपण कधीच विसरत नाही. जसे की, स्वतंत्रा दिवशी आपली वेशभूषा परिधान करण्याचे अवाहन विराटने या व्हीडिओमार्फत केले आहे. त्याने यामध्ये शिखर आणि पंतला नॉमिनेट केले आहे.
पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीने दमदार फलंदाजी करताना १४९ आणि ५१ धावांची खेळी केली होती. पहिल्या कसोटीमध्ये एकाकी झुंज देणारा विराट कोहली या खेळीच्या बळावर आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. पहिल्या कसोटीमध्ये भारताला ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. पहिल्या कसोटीमध्ये शिखर धवन आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. तर ऋषभ पंतला संधी मिळाली नव्हती. बुधवारी लॉर्डसवर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून विराटसेना भारतीयांना स्वातंत्र्य दिनाचे गिफ्ट देण्यास सज्ज झाला आहे.