विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि वन-डे मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. दोन्ही मालिका भारतीय संघाने 2-1 च्या फरकाने जिंकल्या. या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. 23 जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता, न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही या दौऱ्यासाठी कंबर कसलेली आहे. संघाचा अनुभवी खेळाडूने आपल्या संघाला विराटसोबत रणनिती आखताना, रोहित आणि शिखर न विसरण्याला सूचक सल्ला दिला आहे.
अवश्य वाचा – धोनीला एकटं सोडलं नाहीस हे चांगलं केलंस, सौरव गांगुलीकडून विराटचं कौतुक
“सध्याच्या घडीला विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे. भारतीय संघाची मदार विराट कोहलीवर आहे असं कोणत्याही गोलंदाजाला वाटू शकतं, मात्र असं वाटण्यात तुम्ही फसू शकता. विराटला बाद करण्याआधी तुम्हाला रोहित आणि शिखर धवनला बाद करणं गरजेचं आहे. या दोन्ही खेळाडूंची कामगिरीही उल्लेखनीय आहे. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना या खेळाडूंना बाद करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.” रॉस टेलर प्रसारमाध्यमांशी बोलत होता.
अवश्य वाचा – जागतिक क्रिकेटमध्ये दरारा निर्माण करण्यात भारत यशस्वी – डीन जोन्स
न्यूझीलंड दौऱ्याचा भारताचा इतिहास फारसा चांगला राहिलेला नाहीये. आतापर्यंत 7 प्रयत्नांमध्ये भारतीय संघ एकदाच वन-डे मालिका जिंकू शकला आहे. त्यामुळे भारतीय संघापुढे यंदाच्या दौऱ्यात मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : हार्दिक-राहुलवरची बंदी अजिंक्य रहाणेच्या पथ्यावर?